25 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरक्राईमनामाएटीएसला मिळणार सचिन वाझेचा ताबा?

एटीएसला मिळणार सचिन वाझेचा ताबा?

Google News Follow

Related

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेरील स्फोटकांनी भरलेल्या गाडीच्या प्रकरणाचा एनआयए तपास करत आहे, तर एटीएस मनसुख हिरेन यांच्या हत्येचा तपास करत आहे. सचिन वाझे यांना एनआयएने ताब्यात घेतले होते. मात्र सचिन वाझे यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी चालू असताना एटीएसने देखील सचिन वाझे यांचा ताबा मागितला आहे. याबाबत सचिन वाझे यांचे प्रॉडक्शन वॉरंट एटीएसला मिळालं असल्याची माहिती प्राप्त होत आहे. एनआयएची कोठडी संपल्यानंतर एटीएसला सचिन वाझे यांचा ताबा मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

एटीएस मनसुख हिरेन यांच्या हत्येचा तपास करत आहे. मनसुख हिरेन आणि सचिन वाझे यांची १७ फेब्रुवारी रोजी भेट झाली होती असे एटीएसच्या तपासातून समोर येत आहे. मात्र मनसुख हिरेन यांनी त्यांच्या जबाबात आपली आणि सचिन वाझे यांची भेट झाली नसल्याचे म्हटले होते.

हे ही वाचा:

ठाकरे सरकारच्या मंत्रीमंडळातील गृहमंत्री बदलणार?

ठाकरे सरकारमधील मंत्र्याच्या लॅविश राहणीमानासाठी करोडोंचा खर्च

वाझे प्रकरणातील प्रॅडोचा मूळ मालक शिवसेनेचाच

मनसुख हिरेन आणि सचिन वाझे यांची जीपीओसमोर सुमारे १० मिनिटे भेट चालल्याची माहिती एटीएसच्या हाती लागली आहे. याच दिवशी मनसुख हिरेन यांची स्कॉर्पिओ गाडी चोरीला गेली होती. याबाबत त्यांनी दुसऱ्या दिवशी एफआयआर देखील नोंदवला होता. ही माहिती सुत्रांच्या मार्फत प्राप्त झाली आहे.

याच प्रकरणातील स्कॉर्पिओ गाडीत सापडलेल्या स्फोटकांचा तपास एनआयएकडून केला जात आहे. एनआयएच्या तपासाबाबत सातत्याने माहिती पुढे येत असताना मनसुख हिरेन यांच्या हत्येचा तपास कुठवर आला याबाबत नेमकी माहिती उपलब्ध नाही.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणविस यांनी सचिन वाझे यांचा मुद्दा विधानसभेत सातत्याने उचलून धरला होता. अंबानींच्या घरासमोर सापडलेल्या स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ गाडीचे प्रकरण आणि या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांच्या हत्येचे प्रकरण यामुळे ठाकरे सरकार अडचणीत सापडले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा