साई रिसॉर्ट प्रकरणी अनिल परब यांची संपत्ती जप्त

ईडीकडून कारवाई

साई रिसॉर्ट प्रकरणी अनिल परब यांची संपत्ती जप्त

दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणी ईडीकडून उद्धव ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे.
शिवसेना नेते अनिल परब यांची संपत्ती ईडीकडून जप्त करण्यात आली असून दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणी ईडीकडून ही कारवाई करण्यात आली असल्याचे कळते.

ईडीने दिलेल्या माहितीनुसार दहा कोटी वीस लाख रूपयांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. ईडीने ट्विट करून याबाबतची माहिती दिली आहे. या प्रकरणाशी माझा काही संबंध नसून  कारवाई झाली असेल तर याबाबत मी कोर्टात दाद मागणार असल्याचे अनिल परब यांनी  म्हटले आहे. किरीट सोमय्या यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया देताना आता अनिल परब यांची अटक अटळ असल्याचे म्हटले आहे. सोमय्या यांनी नव्या वर्षात कुणाकुणावर कारवाई होणार याची माहितीही मध्यंतरी दिली होती.

ईडीने आज मनी लाँड्रिंग प्रकरणात महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि उद्धव ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांची १०.२० कोटी रुपयांची मालमत्ता तात्पुरती जप्त केल्याची माहिती दिली आहे. जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेत रत्नागिरीतील ४२ गुंठे जमीन आणि तेथे बांधण्यात आलेल्या साई रिसॉर्टचा समावेश आहे. पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या तक्रारीच्या आधारावर ईडीने ही कारवाई केली आहे.

 

हे ही वाचा:

जितेंद्र आव्हाड आपली सर्वस्वी श्रद्धा औरंगजेबावर आहे!

सोमालियामध्ये दोन कारमध्ये स्फोट, ९ ठार

सिंधुताई सपकाळ अनाथांची माय

रितेशच्या चित्रपटाने प्रेक्षकांना लावले “वेड”

दापोलीतील साई रिसॉर्टशी संबधीत प्रकरणी ईडीकडून अनिल परब यांची अनेक वेळा चौकशी झाली होती. याशिवाय साई रिसॉर्टप्रकरणी ईडीने सात ठिकाणी छापेमारी देखील केली होती. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी साई रिसॉर्टप्रकरण लावून धरले होते.

Exit mobile version