‘आसाममध्ये सर्वाधिक तर महाराष्ट्रात सर्वात कमी मतदान’

तिसऱ्या टप्प्याच्या मतदानाची ५ वाजेपर्यंतची आकडेवारी आली समोर

‘आसाममध्ये सर्वाधिक तर महाराष्ट्रात सर्वात कमी मतदान’

देशभरात लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्याचे मतदान आज पार पडले.११ राज्य आणि केंद्रशासित प्रदेश मिळून अशा एकूण ९३ जागांवर मतदान झाले.गुजरातमधील २५ , उत्तर प्रदेशातील १० , महाराष्ट्रातील ११ आणि कर्नाटकातील १४ जागांसह एकूण ९३ जागांवर मतदान झाले आहे.दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ६० टक्क्यांहून अधिक मतदान झाले आहे.

समोर आलेल्या आकडेवारीनुसार आसाममध्ये सर्वाधिक मतदान झाले आहे तर महाराष्ट्रात सर्वात कमी मतदान झाले आहे.आसाममध्ये ७४.८६ टक्के तर महाराष्ट्रामध्ये ५३.४० टक्के इतके मतदान झाले आहे.

११ राज्यातील आकडेवारी
आसाम – ७४.८६ टक्के
बिहार-५६.०१ टक्के
छत्तीसगड-६६.८७ टक्के
दादरा नगर हवेली-६५.२३ टक्के
गोवा-७२.५२ टक्के
गुजरात-५५.२२ टक्के
कर्नाटक-६६.०५ टक्के
मध्यप्रदेश -६२.२८ टक्के
महाराष्ट्र-५३.४० टक्के
उत्तर प्रदेश-५५.१३ टक्के
पश्चिम बंगाल-७९.९३ टक्के

हे ही वाचा:

पॅलेस्टाईन समर्थक निदर्शकांनी अमेरिकेचा ध्वज जाळला!

“बाळासाहेबांचे विचार गुंडाळल्यामुळेचं उद्धव ठाकरेंसमोर अल्ला हो अकबर, टिपू सुलतानचे नारे”

‘झारखंडमध्ये ईडीची पुन्हा धाड, १.५ कोटी रुपये जप्त’

बलात्काराच्या गुन्ह्यातला आरोपी दाऊद तब्बल ४० वर्षांनी सापडला आग्र्यात

महाराष्ट्रातील ११ लोकसभा मतदारसंघासाठी आज मतदान पार पडले.राज्यात केवळ ५३.४० टक्के मतदान झालं आहे जे सर्वात कमी आहे.त्यामध्ये सर्वाधिक कोल्हापूरमध्ये ६३.७१ तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघात ६२.१८ टक्के मतदान झालं आहे.तर सर्वात कमी मतदान बारामतीमध्ये ४५.६८ टक्के मतदान झाले आहे.

महाराष्ट्र राज्यातील ११ जागांची आकडेवारी
लातूर – ५५.३८ टक्के
सांगली – ५२.५६ टक्के
बारामती – ४५.६८ टक्के
हातकणंगले – ६२.१८ टक्के
कोल्हापूर – ६३.७१ टक्के
माढा – ५०.०० टक्के
उस्मानाबाद – ५२.७८ टक्के
रायगड – ५०.३१ टक्के
रत्नागिरी -सिंधुदूर्ग- ५३.७५ टक्के
सातारा – ५४.११ टक्के
सोलापूर – ४९.११ टक्के

Exit mobile version