देशभर सध्या द काश्मीर फाईल्स या चित्रपटाचा बोलबाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळताना दिसत असून तिकीटबारीवर हा चित्रपट सुपरहिट ठरला आहे. अशातच आसाम मधील भारतीय जनता पार्टीच्या सरकारने या चित्रपटाच्या संदर्भात महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आसाम मधील सरकारी कर्मचाऱ्यांना हा चित्रपट पाहण्यासाठी अर्ध्या दिवसांची राजा मंजूर करण्यात आली आहे.
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांनी याबाबतची घोषणा केली आहे. यासाठी आसाम मधील सरकारी कर्मचाऱ्यांना आपल्या वरिष्ठांना या बाबत माहिती देणे बंधनकारक असणार आहे. तर दुसऱ्या दिवशी कार्यलयात आपल्या चित्रपटाची तिकिटे द्यावी लागणार आहेत. या चित्रपटाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि जास्तीत जास्त लोकांनी हा चित्रपट बघावा म्हणून आसाम सरकारमार्फत हे पाऊल उचलण्यात आले आहे.
हे ही वाचा:
नवाब मलिकांना दणका; ईडी फराझ मलिकला तिसरं समन्स पाठवणार
माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांचे निधन
आजपासून १२ ते १४ वर्ष वयोगटातील मुलांचे लसीकरण
महाराष्ट्र गुजरात सीमावाद लवकरच संपणार
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांनी स्वतः हा चित्रपट पाहायला उपस्थिती लावली आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या चित्रपटाचे कौतुक केले आहे. देशभरातून या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. सुरुवातीला हा चित्रपट अगदी मोजक्याच चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित करण्यात आला होता. पण नंतर प्रेक्षकांचा प्रतिसाद बघता चित्रपटाचे स्क्रीन्स आणि शो वाढवण्यात आले.
या चित्रपटात १९९० साली झालेल्या काश्मिरी पंडितांच्या नरसंहाराची कथा मांडण्यात आली आहे. विवेक अग्निहोत्री यांनी या चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन केले आहे. तर अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी, पुनीत इस्सार यांच्या प्रमुख भूमिका आहेत.