शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात गोंधळ निर्माण झाला आहे. एकनाथ शिंदे आमदारांसोबत सुरतमार्गे आसाममधील गुवाहाटीला दाखल झाले आहेत. शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे आणि अपक्ष मिळून असे ४६ आमदार असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले होते. यादरम्यान, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांचं धक्कादायक विधान समोर आलंय.
असम में कई अच्छे होटल हैं, वहां कोई भी आकर ठहर सकता है…इसमें कोई दिक्कत नहीं है। मुझे नहीं पता कि महाराष्ट्र के विधायक असम में रह रहे हैं या नहीं। अन्य राज्यों के विधायक भी असम में आ सकते हैं और रह सकते हैं: असम के मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा, दिल्ली pic.twitter.com/Z68Ne8d4fo
— ANI_HindiNews (@AHindinews) June 23, 2022
सध्या महाराष्ट्राचे ४६ आमदार आसाममधील गुवाहाटीमध्ये आहेत. आमदारांचा हा आकडा आणखी वाढेल असं, एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. यावेळी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले, महाराष्ट्राचे आमदार आसाममध्ये राहतात की, नाही हे मला माहीत नाही. इतर राज्यातील आमदारही आसाममध्ये येऊन राहू शकतात, तसेच महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींशी आपला काहीही संबंध नसल्याचं त्यांनी स्पष्ट केले. पर्यटन स्थळ म्हणून आसामची स्वतःची वेगळी ओळख आहे. राज्यात अनेक चांगली हॉटेल्स आहेत. ज्यामध्ये कोणीही येऊन राहू शकतं. महाराष्ट्राचे आमदार आसाममध्ये येऊन हॉटेलमध्ये राहत आहेत की नाही, याबाबत माझ्याकडं कोणतीही माहिती नाही, असंही म्हणाले आहेत.
हे ही वाचा:
पंतप्रधान नरेंद्र मोदी जाणार जर्मनी, युएई दौऱ्यावर
मुख्यमंत्र्यांनी ‘वर्षा’ सोडताच आणखी दोन आमदार गुहावटीत
गुरुवार,२३ जून रोजी एकनाथ शिंदेंच्या ताफ्यात शिवसेनेचे तीन आणि अपक्ष दोन आमदार सामील झाले. सध्या हॉटेलमध्ये शिंदे यांच्यासोबत ४६ आमदार आहेत, त्यापैकी ३७ शिवसेनेचे आहेत तर ९ आमदार अपक्ष आहेत.