काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नेहमीप्रमाणे भारताबाहेर भारताची बदनामी करण्याची परंपरा यावेळीही कायम राखली. केंब्रिज विद्यापीठातील भाषणात त्यांनी चीनची स्तुती करताना भारतात लोकशाही शिल्लक राहिली नसल्याचे म्हटले. त्यावरून भाजपाने त्यांना लक्ष्य केले आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वसर्मा यांनी ट्विटची मालिका शेअर करत राहुल गांधींची पोलखोल केली आहे.
लर्निंग टू लिसन इन द २१सेंच्युरी या भाषणात राहुल गांधी यांनी चीनवर स्तुतीसुमने उधळली आहेत. त्यावरून आसामचे मुख्यमंत्री आणि भाजपा नेते हिमांता बिस्वसर्मा यांनी ट्वीट करून टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, आधी परकीयांनी भारताला लक्ष्य केले आता आपलेच परदेशी भूमीवर जाऊन भारताला लक्ष्य करत आहेत. परकीय भूमीवर भारताची बदनामी करण्याचा हा प्रकार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य करण्यासाठीच हा खटाटोप आहे.
हे ही वाचा:
गुजरातमधील कंपनीवर ईडीच्या छाप्यात इतक्या कोटींचे हिरे जप्त
जाकार्तामध्ये तेल गोदामाला लागलेल्या आगीत १७ जणांचा होरपळून मृत्यू
उद्धवजी, हे पाप नाही मग पुण्य कसे?
उद्धवजी, हे पाप नाही मग पुण्य कसे?
त्यांनी राहुल गांधी यांची या भाषणातील काही विधाने कोट करत त्याचे वास्तव मांडले आहे. राहुल गांधी म्हणतात की, चीन ही सुपरपॉवर आहे. वन बेल्ट आणि वन रोड या माध्यमातून ते विकास करत आहेत. त्यावर बिस्वसर्मा म्हणतात की, बीआरआय ही प्रणाली अनेक देशांना कर्जाच्या डोंगराखाली दाबणारी आहे. अंकल पित्रोदा यांनी राहुल गांधी यांना हे समजावून सांगायला हवे. राहुल म्हणतात की, बौद्धीक संपत्ती हक्कांवर चीनचा विश्वास नाही. त्यावर बिस्वसर्मा म्हणतात की, जर पी. चिदंबरम यांनाही असे वाटत असेल तर त्यांनी सांगावे की, कॉपीराइट कायदा आणि उचलेगिरीला प्रोत्साहन दिल्यामुळे उत्पादन क्षेत्राला कसा फायदा होऊ शकेल. बिस्वसर्मा यांनी ट्विट केले आहे की, राहुल गांधी चीनच्या विचारधारेमुळे प्रभावित झालेले आहेत. त्यांच्या विचारधारेमुळे माझ्या विचारांना आकार आला. त्यावर बिस्वसर्मा म्हणतात की, चीनवर ही स्तुतीसुमने अपेक्षितच आहेत. कारण त्यांच्याकडून ज्या देणग्या मिळतात, त्यांच्या ऋणाखाली गांधी कुटुंबीय दबले आहे त्याबद्दल त्यांना ही स्तुती करावीच लागते.