राहुल गांधी बीजेपी, आरएसएसला गुरु मानत असतील तर त्यांनी नागपूरमध्ये जाऊन नतमस्तक व्हावे असा जोरदार टोला आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी लगावला आहे. राहुल गांधी यांनी मी आरएसएस आणि बीजेपीला माझे गुरु मानतो अशी उपरोधिक टीका केली होती. त्याला सरमा यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
राहुल गांधी बीजेपी, आरएसएसला गुरु मानत असतील तर त्यांचे नागपूरमध्ये स्वागत आहे. तेथे जाऊन त्यांनी भारत मातेच्या झेंड्या समोर नतमस्तक व्हावे असा उपहासात्मक सल्ला दिला आहे. राहुल गांधी यांनी बीजेपी, आरएसएसच नाही तर भारत मातेच्या झेंड्याला आपले गुरू मानले पाहिजे . नागपूरमध्ये त्यांचे स्वागत आहे. त्यांनी भारत मातेच्या झेंड्या समोर गुरु दक्षिणा द्यावी असा टोलाही सरमा यांनी लगावला आहे.
इतक्या कडाक्याच्या थंडीतही राहुल गांधी यांना थंडी लागत नाही. ते टीशर्ट घालून यात्रा करतात यावरूनही आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांना तपस्वी अशी उपाधी देखील देऊन टाकली आहे. त्यावरही सरमा यांनी जोरदार टीका केली आहे. राहुल गांधी यांचा हाफ टीशर्ट फॅशनचा भाग असून ते व्यक्तिगत आहे. पण जर राहुल गांधी यांना थंडीची भीती वाटत नसेल तर त्यांना तवांगला घेऊन जाऊ असा टोलाही लागावला.
हे ही वाचा:
निर्दयी कोण शिंदे की उद्धव ठाकरे?
स्थायी समितीचे माजी अध्यक्ष राडा का करतायत?
ब्राझिलचे महान फुटबॉलपटू, तीनवेळा विश्वविजेते ठरलेले पेले कालवश
स्थायी समिती अध्यक्षांचा वचपा?
भारत जोडो यात्रा ही देशातील वाढत्या द्वेष, भीती आणि हिंसाचाराच्या विरोधात आहे. भारत जोडो यात्रा हा देशाचा आवाज आहे. राहुल यांनी आरएसएस आणि भाजप नेत्या. राहुल यांनी आरएसएस आणि भाजप नेत्यांचेही आभार मानले. ते म्हणाले की, ते जितके जास्त आक्रमण करतात, तितकी आम्हाला सुधारणा करण्याची संधी मिळते. त्यांनी जरा अधिक आक्रमकपणे हल्ला चढवावा, तर त्याचा फायदा काँग्रेसला आणि मला फायदा होईल, असे मला वाटते. एक प्रकारे मी त्यांना माझा गुरु मानतो. आपण काय केले पाहिजे आणि काय करू नये याचा एक प्रकारे ते आपल्याला मार्ग दाखवत आहे असे वक्तव्य राहुल गांधी यांनी केले होते.