‘अनिल मसिह यांना विचारू, असे का केले?’

चंडिगड महापौर निवडणुकीबाबत भाजपचा खुलासा

‘अनिल मसिह यांना विचारू, असे का केले?’

वादग्रस्त चंडिगड महापौर निवडणूक अधिकारी राहिलेले अनिल मसिह यांच्यापासून भाजपने अंतर राखले आहे. चंडिगडचे भाजप प्रदेशाध्यक्ष मसिह यांना विचारणार आहेत की, त्यांनी असे का केले? नुकतीच मसिह यांनी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागितली आहे. सर्वोच्च न्यायालयात कथितरीत्या खोटी साक्ष दिल्याबद्दल त्यांना नोटीस पाठवण्यात आली होती.

इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत पंजाबचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष जतिंदर मल्होत्रा यांनी याबाबत खुलासा केला. ‘माझी त्यांच्याशी चर्चा होऊ शकली नाही. ते येतील, तेव्हा विचारू की, असे का केले.’ भाजपला माहीत नाही का, मसीह यांनी असे का केले?, असे त्यांना विचारले असता, ‘ते पक्षात नाहीत. त्यांना राज्यपालांनी नियुक्त केले होते, पक्षाने नाही. तेव्हा त्यांच्याशी पक्षाचा संबंध जोडू नका,’ अशी विनंती त्यांनी केली.

‘ते कधीकाळी आमचे सदस्य होते. परंतु आज परिस्थिती वेगळी आहे. ज्या प्रकारे राष्ट्रपतींतर्फे एखाद्याची निवड केली जाते, त्याप्रकारे राज्यपालांनी त्यांची नियुक्ती केली होती. त्यांची एक वेगळी ओळख असते,’ असे ते म्हणाले.

दुसरीकडे, काँग्रेस आणि आम आदमी पक्षही मसीह यांनी माफी मागूनही समाधानी नाहीत. दोन्ही पक्षांनी भाजपकडे उत्तर मागितले आहे. चंडिगड महापौर निवडणुकीतील रिटर्निंग ऑफिसर अनिल मसिह यांनी सर्वोच्च न्यायालयात बिनशर्त माफी का मागितली, असा प्रश्न काँग्रेसचे पवन बन्सल यांनी भाजपला विचारला आहे.

हे ही वाचा:

हिंदू नववर्षाचा राज्यात उत्साह! शोभा यात्रांचे आयोजन

हिंदू तरुणाला इस्लाम धर्म स्वीकारून कलमा वाचायला लावला!

निमिष मुळे, झारा बक्षी सर्वोत्तम जलतरणपटू

‘मी गोमांस खात नाही…गर्व आहे मला हिंदू असल्याचा’!

आप नेता प्रेम गर्ग यांनीही मसीह यांना शिक्षा ठोठावण्याची मागणी केली आहे. ‘अनिल मसिह यांनी चूक नव्हे तर लोकशाहीची हत्या केली आहे. देशाच्या राज्यघटनेचा थट्टा केली आहे. त्यांनी त्यांच्या बळाचा गैरवापर केला आणि आणचे अधिकार हिरावले. मसिह यांनी मतांची चोरी केली होती,’ अशी टीका केली. मसिह यांना अद्याप अटक न झाल्याबद्दल त्यांनी प्रश्न उपस्थित केला. मसिह यांना अद्याप म्युनिसिपल कॉर्पोरेशनमधून का हटवण्यात आलेले नाही, असेही त्यांनी विचारले.

Exit mobile version