मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वात उत्तर प्रदेश सरकारची जेवर विमानतळ आशिया खंडातील सर्वात मोठे विमानतळ म्हणून विकसित करण्याची योजना आहे. अर्थमंत्री सुरेश खन्ना यांनी सोमवारी जेवर विमानतळासाठी २००० कोटी रुपयांची तरतूद करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. अर्थमंत्री सुरेश खन्ना यांनी सोमवारी राज्य विधानसभेत २०२१-२२ साठी ५,५०,२७० कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर करताना हे सांगितले.
योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने पूर्वीच प्रस्तावात मांडलेल्या दोन धावपट्ट्यांऐवजी सहा धावपट्ट्या बनवण्याचा प्रस्ताव मांडला आहे. योगी सरकारने यावेळी पहिला पेपरलेस अर्थसंकल्प सादर केला.
हे ही वाचा:
लॅपटॉपवरून अर्थसंकल्पीय भाषण वाचत असताना अर्थमंत्री खन्ना म्हणाले की, “उत्तर प्रदेशला ‘आत्मानिरभर’ बनविणे आणि राज्याचा सर्वांगीण विकास सुनिश्चित करणे हे आमचे लक्ष आहे.” पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांपूर्वीचा आणि आत्तापर्यंतचा योगी सरकारचा हा पाचवा अर्थसंकल्प आहे.
यापूर्वी, स्वित्झरलँडच्या झुरीच इंटरनॅशनल एअरपोर्ट कंपनीला नोएडा मधील जेवर एरपोर्टसाठी निवडण्यात आले होते. या विमानतळाचा पहिला टप्पा १३३४ हेक्टर परिसरात पसरलेला असेल आणि त्याच्या बांधकामासाठी ₹४५८८ कोटीचा खर्च येईल. हा टप्पा २०२३ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित आहे.