भारत आता आत्मनिर्भर होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणांमधून नेहमीच आत्मनिर्भरतेचा प्रसार केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून आशियातील सर्वात मोठ्या अशा हेलिकॉप्टर निर्मितीचा कारखाना कर्नाटक येथे उभा राहात आहे. त्याचा पायाभरणी समारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होत आहे. आशियातल्या या सर्वात मोठ्या हेलिकॉप्टर कारखान्याचे उद्या सोमवारी कर्नाटकमध्ये उदघाटन आणि पायाभरणी समारंभ होणार आहे. आता आपल्या भारत देशातच कर्नाटकातील टुमकुर येथे हेलिकॉप्टर निर्मितीची सुविधा उपलब्ध झाल्यामुळे संपूर्ण स्वदेशी बनावटीची निर्मिती असलेले हेलिकॉप्टर आपल्याकडे आता सहज उपलब्ध असतील.
Hindustan Aeronautics Limited’s new helicopter factory is to be dedicated to the nation at Tumakuru, Karnataka by Prime Minister Narendra Modi on February 6. HAL would first start production of Light Utility Helicopters from this facility. pic.twitter.com/X8PtJNkoQ9
— ANI (@ANI) February 4, 2023
नरेंद्र मोदी पायाभरणी करत असणाऱ्या हा कारखाना संपूर्ण आशियातला पूर्ण ग्रीनफिल्डचा कारखाना असेल. या कारखान्यातून सुरवातीला लाइगत युटिलिटी हेलिकॉप्टर बनवण्यात येतील. त्यानंतर स्वदेशी बनावट आणि संपूर्ण विकसित असे तीन टन श्रेणीतील हेलिकॉप्टर, शिवाय एकल इंजिन बहुउद्देशीय युटिलिटी हेलिकॉप्टर्स टप्प्याटप्प्याने बनवण्यात येतील. जी उच्चतम प्रतीचीच असतील. यानंतर या कारखान्यातून लाईट कॉम्बॅट हेलिकॉप्टर आणि इंडियन मल्टिरोल हेलिकॉप्टर , शिवाय ऍडव्हान्स लाइट हेलिकॉप्टरची देखभाल आणि दुरुस्ती , कारखान्यांत इंडस्ट्री चार मानांकन असलेला उत्पादनाचा सेटअप असणार आहे.
हे ही वाचा:
माझ्या हत्येचा कट रचला जात आहे
आमदार संतोष बांगर यांच्यावर गुन्हा दाखल
इंग्रजी राजवटीचा पाय खिळखिळा करणारा “लाल”
हवाई अभ्यासच्यावेळी सुखोई – मिराज विमाने हवेत धडक
पुढच्या वीस वर्षांमध्ये टुमकुर येथील हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड येथून तीन ते पंधरा टनांच्या श्रेणीमध्ये एक हजार पेक्षा जास्त हेलिकॉप्टर्स चे उत्पादन करण्याची योजना आखत आहेत. त्यामुळे या प्रदेशातील सुमारे सहा हजार लोकांना रोजगार उपलब्ध होणार असल्याचे पंतप्रधान कार्यालयाकडून सांगण्यात येत आहे. शिवाय भविष्यात सिव्हिल हेलिकॉप्टर्स याच कारखान्यातून निर्यात करण्याची क्षमता वाढवण्यासाठी या कारखान्याचा विस्तार केला जाणार असल्याची माहितीही पंतप्रधान कार्यालयाने दिली आहे. आशियातील पहिल्या बनणाऱ्या या कारखान्यामुळे भारतात स्वदेशी बनावटीची हि हेलिकॉप्टरची संपूर्ण रचना ,त्याचा विकास यामुळे हि हेलिकॉप्टर उत्पादन करण्याचा पहिला बहुमान आपल्या देशाला मिळेल.
या उत्पादन निर्मिती प्रक्रियेत फक्त हेलिकॉप्टरचे उत्पादन न होता या संपूर्ण प्रदेशाचा विकास आपोआपच होईल जसे की, विविध पायाभूत आणि नागरी सुविधा, आरोग्य आणि वैद्यकीय सुविधा , शाळा, महाविद्यालये, इत्यादी अशी सर्व माहिती संरक्षण मंत्रालयाने दिली आहे. पंतप्रधान मोदी टुमकुर येथील तीपतूर आणि चिक्कनायकहल्ली तालुक्यातल्या एकूण १४७ वस्त्यांना बहू ग्राम पाणीपुरवठा योजना सुमारे ११५ कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणार आहे. त्यामुळे या भागातील सर्व लोकांना स्वच्छ आणि भरपूर पिण्याचे पाणी उपलब्ध होणार आहे.
चेन्नई बंगळुरु इंडस्ट्रियल कॉरिडॉरचा एक भाग म्हणून राष्ट्रीय औद्योगिक कॉरिडॉर विकास कार्यक्रमांतर्गत तुमाकुरू मधील औद्योगिक पायाभरणी करतील ८,४८४ एवढ्या एकरावर पसरलेल्या औद्योगिक नगरीचा संपूर्ण विकास तीन टप्प्यात करण्यात येणार आहे.