‘डीपफेक व्हिडीओ’बाबत मोदी सरकार कठोर

केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांचा इशारा

‘डीपफेक व्हिडीओ’बाबत मोदी सरकार कठोर

सोशल मीडिया कंपन्यांनी डीपफेक व्हिडीओ हटवण्याबाबत पावले न उचलल्यास या कंपन्यांना माहिती व प्रसारण उद्योग अधिनियमांतर्गत ज्या सवलती केंद्र सरकारकडून मिळत आहेत, त्या बंद केल्या जातील, असा इशारा केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिला आहे. या अधिनियमातील कलमानुसार, उपयोगकर्त्याने पोस्ट केलेल्या कोणत्याही व्हिडीओ अथवा छायाचित्रासाठी त्या सोशल मीडिया कंपनीला जबाबदार ठरवले जात नाही.

 

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केले की, सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना नोटीस पाठवण्यात आली असून सर्व डीपफेक व्हिडीओ हटवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. या कंपन्यांनीही ते या संदर्भात कारवाई करत असल्याचे केंद्र सरकारला कळवले आहे.

हे ही वाचा:

मुंबईकर ते हिटमॅन! भारताचा कर्णधार रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास

नूंहमधील हिंसाचार टळला; अल्पवयीनांनी केली होती दगडफेक

जरांगेना भुजबळांनी चेपले ते विसरा; पण डॉ.आंबेडकर लक्षात ठेवा….

मणिपूरमध्ये स्वतंत्र सरकार स्थापन करण्याची धमकी देणारा मुआन टॉम्बिंगविरुद्ध गुन्हा

‘आम्ही या प्रकरणी सर्व दिशांनी तीव्र कारवाई करा, अशा सूचना कंपन्यांना दिल्या आहेत,’ असे वैष्णव यांनी सांगितले. ‘या कंपन्या कारवाया करत आहेत. मात्र आम्हाला वाटते की आणखी काही पावले उचलावी लागतील. या संदर्भात येत्या तीन-चार दिवसांत सर्व सोशल मीडिया कंपन्यांची बैठक बोलावण्यात येईल. आम्ही त्यांना चर्चेसाठी बोलावू. डीपफेक व्हिडीओला रोखण्यासाठी शक्य होतील ते सर्व प्रयत्न करून हे तंत्रज्ञान आणखी चांगले करण्याचे निर्देश देण्यात येतील,’ असे वैष्णव यांनी स्पष्ट केले.

हल्लीच अभिनेत्री रश्मिका मंदाना, कतरिना कैफ आणि काजोलचे डीपफेक व्हिडीओ बनले असून त्यामुळे या अभिनेत्रींना मनस्ताप झाला आहे.

Exit mobile version