उबाठा गटाच्या माजी नगरसेविका अश्विनी मते यांनी सोमवारी(१५ एप्रिल) आपल्या शेकडो समर्थकांसह भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे.मुंबई भाजपा अध्यक्ष आ.आशिष शेलार, प्रदेश भाजपाचे कोषाध्यक्ष व ईशान्य मुंबई मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आ.मिहीर कोटेचा आदी मान्यवरांच्या उपस्थितीत अश्विनी मते यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.मुंबईतील भाजप कार्यालयात हा पक्ष प्रवेश पार पडला.
लोकसभेच्या तोंडावर ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के बसत आहेत.रविवारी(१४ एप्रिल) जळगाव जिल्ह्यातील अमळनेर आणि चोपडा परिसरातील पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. तब्बल ४०० कार्यकर्त्यांनी आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला होता. यानंतर आज उबाठा गटाच्या माजी नगरसेविका अश्विनी मते यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
हे ही वाचा:
‘आप’ला आणखी एक धक्का, आ. अमानतुल्ला खान यांचा जामीन अर्ज फेटाळला!
मणिपूर:हिंसाचारात लुटलेली शस्त्रे ‘ड्रॉप बॉक्स’मध्ये ठेवा!
तीन षटकारांच्या हॅटट्रिकनंतर धोनीने चाहत्याला दिली खास भेट
“पत्राचाळीचे आरोपीही पंतप्रधान मोदींना पत्र लिहायला लागले आहेत”
मुंबई भाजपा अध्यक्ष आ.आशिष शेलार यांनी अश्विनी मते व त्यांच्या समर्थकांचे भारतीय जनता पार्टी मध्ये स्वागत केले. यावेळी प्रदेश भाजपाचे कोषाध्यक्ष व ईशान्य मुंबई मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आ.मिहीर कोटेचा म्हणाले की, अश्विनीताई या सामान्य माणसाची कामे मार्गी लावण्यासाठी धडपड करणाऱ्या लोकप्रतिनिधी आहेत. नरेंद्र मोदी यांच्या गरीब कल्याणाच्या कार्यक्रमाला साथ देण्यासाठी अश्विनी मते यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. अश्विनी मते यांच्या भाजपा प्रवेशामुळे मिहीर कोटेचा यांचे मताधिक्य आणखी वाढणार आहे, असे खा.मनोज कोटक म्हणाले.
उबाठा गटात काम करताना आपल्याला विकास कामे करताना त्रास होत होता म्हणून आपण भारतीय जनता पार्टीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला, असे अश्विनी मते यांनी सांगितले. अश्विनी मते यांच्यासमवेत उबाठा गटाच्या विनायक कोरडे, बाळू सोमटोपे, मलंग शेख, सुरेश मोरे, अर्जुन चौरसिया, महावीर नाईक, महेंद्र सोनावणे या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे.