अश्विन रामास्वामी बनले अमेरिकेत निवडणूक लढवणारे पहिले भारतीय-अमेरिकी जेन झेड

अश्विन रामास्वामी बनले अमेरिकेत निवडणूक लढवणारे पहिले भारतीय-अमेरिकी जेन झेड

भारतीय वंशाचे अमेरिकी नागरिक अश्विन रामास्वामी अमेरिकेतील विधानसभा निवडणूक लढवणारे दुसऱ्या पिढीतील पहिले भारतीय-अमेरिकी म्हणजेच जेन झेड ठरले आहेत. साधारण १९९६-९७ ते २०१२-१५ या दरम्यान ज्यांचा जन्म झाला असेल त्यांच्या पिढीला, जनरेशन झेड किंवा ‘जेन-झी’ असे म्हटले जाते. रामास्वामी अमेरिकेतील जॉर्जियामधून सिनेटसाठी निवडणूक लढवतील. त्यांचे वय अवघे २४ वर्षे आहे.

रामास्वामी यांना नवे उगवते नेते म्हणून पाहिले जात आहे. रामास्वामी यांचे आई-वडिल १९९०मध्ये तमिळनाडूमधून अमेरिकेत येऊन वसले होते. दुसऱ्या पिढीचे रामास्वामी डेमोक्रेटिक पक्षाचे उमेदवार आहेत. जर त्यांनी निवडणूक जिंकली तर ते जॉर्जिया विधानमंडळाचे पहिले भारतीय अमेरिकी नागरिक ठरतील. रामास्वामी यांनी सॉफ्टवेअर इंजिनीअरिंग, निवडणूक सुरक्षा आणि प्रौद्योगिक कायदा व निती अनुसंधान यामध्ये करीअर घडवले आहे. त्यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत आपण आपल्या समुदायासाठी निवडणूक लढवत असल्याचे स्पष्ट केले होते. ज्या संधी मला मिळाल्या होत्या, त्या इतरांनाही मिळाव्यात, यासाठी मी कटिबद्ध आहे, असेही ते म्हणाले होते.

हे ही वाचा:

झारखंड: दोन शालेय विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने केली ५० लाखांची फसवणूक!

कोटामधील १६ वर्षीय विद्यार्थ्याचा मृतदेह सापडला

राहुल गांधींच्या अडचणींत वाढ; आसामच्या सीआयडीने पाठवले समन्स!

संदेशखालीचे वार्तांकन करणाऱ्या टीव्ही पत्रकाराला अटक

उपनिषदांमध्ये रस

‘माझे आई-वडील १९९०च्या दशकात अमेरिकेला आले होते. माझी आई चेन्नईची आहे. तर, वडील कोइंबतूरचे. मी भारतीय आणि अमेरिकी संस्कृतीमध्ये वाढलो आहे. मी एक हिंदू आहे. मला माझ्या संपूर्ण आयुष्यात भारतीय संस्कृतीची आवड राहिली आहे. मी मोठा झालो, तेव्हा चिन्मय मिशन बालाविहार येथे गेलो. तिथे मी रामायण, महाभारत आणि भगवद् गीता यांसारख्या महाकाव्याचा अभ्यास केला. जेव्हा मी कॉलेजमध्ये होतो, तेव्हा मी तिथे संस्कृत शिकलो. मी सारे प्राचीन ग्रंथ वाचले आहेत. उपनिषदांमध्ये मला रस आहे. मी संपूर्ण जीवन योग आणि ध्यान केले आहे. आता हे ज्ञान तरुणांपर्यंत पोहोचवण्याची माझी इच्छा आहे,’ असे रामास्वामी म्हणाले.

Exit mobile version