माजी केंद्रीय मंत्री अश्विनी कुमार यांचाही काँग्रेसला राम राम

माजी केंद्रीय मंत्री अश्विनी कुमार यांचाही काँग्रेसला राम राम

पंजाबमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या पाच दिवस आधी काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) सरकारमधील कायदा मंत्री अश्विनी कुमार यांनी मंगळवारी काँग्रेसचा राजीनामा दिला. राजीनामा दिल्यानंतर अश्विनी कुमार म्हणाले की, “पक्षातील निष्ठावंत लोक हळूहळू पक्षाचा निरोप का घेत आहेत, याचा विचार पक्ष नेतृत्वाने करायला हवा. माझा स्वाभिमान आणि सन्मान समोर ठेवून मी हा निर्णय घेतला आहे.

“काँग्रेस पक्षाची राजकीय भूमिका आगामी काळात आणखी कमी होईल. आता मी अधिक ताकदीने राजकारण करेन आणि माझे नशीब स्वतःच लिहीन. आज देशाला लोकांना जोडणाऱ्या राजकारणाची गरज आहे.” असे आश्वासन त्यांनी केले आहे.

राजीनामा देण्याचा निर्णय अचानक घेतलेला नाही

राजीनामा देण्याचा निर्णय अचानक घेतलेला नाही. अत्यंत दु:खी मनाने हा निर्णय घेण्यात आला आहे. आजचा दिवस माझ्यासाठी खूप भावनिक असणार आहे. कोणत्या पक्षात जायचे याचा विचार मी अजून केलेला नाही. माझ्याकडे अनेक पर्याय आहेत,देशाला अशा राजकारणाची गरज आहे जे देशाला एकत्र आणू शकेन. आम्हाला आशा होती की पक्ष आपली कार्यपद्धती सुधारेल आणि सुधारणा अंमलात आणेल, परंतु तसे झाले नाही त्यामुळे अनेकांनी पक्ष सोडला आहे. असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.

हे ही वाचा:

‘आज फिर एक बिल्ली ने दहाडने की कोशिश की है’

‘गौप्यस्फोटापेक्षा आपटी बार बरा असतो’

संजय राऊत यांची ‘साडेतीन’ फिल्म ठरली फ्लॉप!

चारा घोटाळाप्रकरणी लालू प्रसाद यादव दोषी!

अश्विनी कुमार हे यूपीए सरकारमध्ये कायदा आणि न्याय मंत्री होते. ते माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या अत्यंत जवळचे मानले जातात. विशेष म्हणजे पंजाबमध्ये २० फेब्रुवारीला विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. त्याआधी काँग्रेस आणि यूपीए सरकारमध्ये कायदा मंत्री राहिलेल्या अश्विनी कुमार यांनी मंगळवारी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला.

Exit mobile version