काँग्रेस अध्यक्ष होण्यास अशोक गेहलोत राजी

काँग्रेस अध्यक्षपद निवडीच्या हालचालींना वेग

काँग्रेस अध्यक्ष होण्यास अशोक गेहलोत राजी

काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आता महिनाभरापेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे.  त्यामुळे हालचालींना वेग आला आहे. तरीही काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार? याबाबतचा संभ्रम अजूनही कायम आहे. मात्र पक्षाच्या सूत्रांकडून जी माहिती मिळत आहे, ती पाहता अशोक गेहलोत हे या पदावर विराजमान होणार असल्याचे समजते. सध्या काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी राज्यातील काँग्रेस आमदारांची बैठक बोलावली होती.

गेहलोत यांनी त्यांच्या निवासस्थानी पक्षाच्या आमदारांच्या बैठकीत राहुल गांधी यांना पुन्हा एकदा अध्यक्षपद स्वीकारण्यासाठी त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. गेहलोत म्हणाले की, जर राहुल राजी झाले नाहीत तर ते या पदासाठी उमेदवारी देतील. अशोक गेहलोत यांनी काँग्रेसचे हे सर्वोच्च पद सांभाळण्याची तयारी दाखवली असेल, पण त्यांचा मोह अजूनही कायम आहे. ते राजस्थानचे मुख्यमंत्रीपद सोडायला अजिबात तयार नाहीत. काँग्रेस अध्यक्षपदासाठी त्यांनी अनेक अटी घातल्या आहेत.

अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी नामांकन दाखल करण्याची अंतिम तारीख ३० सप्टेंबर आहे. नामनिर्देशनासाठी उमेदवाराने प्रत्यक्ष उपस्थित राहणे देखील आवश्यक आहे.त्यामुळे राहुल गांधी भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून दिल्लीत परतणार नसल्याने ते पक्षाध्यक्षपदासाठी निवडणूक लढवण्याची शक्यता नाही. सध्या ही यात्रा केरळमध्ये असून २९ सप्टेंबरला ती कर्नाटकात दाखल होणार आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर हेही काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उमेदवारी दाखल करू शकतात. त्याच दिवशी त्यांनी सोनिया गांधी यांची भेट घेऊन निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनीही अर्ज भरल्याची चर्चा आहे, मात्र याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. अशोक गेहलोत पक्षाचे अध्यक्ष झाले तर राजस्थानमध्ये नवा मुख्यमंत्री कोण असेल अशी चर्चा आता सुरु झाली आहे.

हे ही वाचा:

पत्राचाळ प्रकरणातून मिळालेल्या पैशात संजय राऊत परदेश दौऱ्यावर गेले

“मास्क न वापरलेल्यांकडून कायद्याच्या कोणत्या तरतुदीनुसार दंड वसूल करण्यात आला?”

बायबलच्या ओळी वाचून पंतप्रधान ट्रस यांनी दिला एलिझाबेथना निरोप

अमरिंदर यांच्यासह त्यांचा पक्षही भाजपात विलिन

अध्यक्ष होण्याआधी या आहेत अटी

त्यांना कोणत्याही परिस्थितीत राजस्थान सोडायचे नाही., त्यांनाही मुख्यमंत्रीपदी राहायचे आहे.दबावाखाली त्यांना मुख्यमंत्रीपद सोडावे लागले तर त्यांना या पदावर आपल्या विश्वासू व्यक्तीला बसवायचे आहे.

हायकमांडचा ताण वाढला

गेहलोत यांच्या या अटींमुळे पक्ष हायकमांड अस्वस्थ होणे स्वाभाविक आहे. याचे कारण म्हणजे राजस्थानमध्ये पक्षाचे युवा नेते आणि माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांचा मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीकडे डोळा आहे. हायकमांडने गेहलोत यांच्या अटी मान्य केल्यास पायलट गट नाराज होण्याची खात्री आहे. त्यांची नाराजी पक्षाला महागात पडू शकते आणि काँग्रेसमध्ये फूट पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Exit mobile version