गेहलोत यांचे मुख्यमंत्रीपद सोडण्याचे संकेत; नवा मुख्यमंत्री कोण

पायलट-भंवर जितेंद्रसह नेते शर्यतीत

गेहलोत यांचे मुख्यमंत्रीपद सोडण्याचे संकेत; नवा मुख्यमंत्री कोण

राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांची निवड आता जवळपास निश्चित झाली आहे. गेहलोत २८ सप्टेंबर रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोतही आता निवडणूक लढवून, राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यावर ‘एक व्यक्ती एक पद’ याचा भंग होणार नाही, असे म्हणताना दिसत आहेत, पण तरीही आजपर्यंत एकही मुख्यमंत्री काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष झाला नाही.

मुख्यमंत्री अशोक गेहलोत राष्ट्रीय अध्यक्ष बनण्याचे स्पष्ट झाले आहे, परंतु गेहलोत यांच्यानंतर राजस्थानचे मुख्यमंत्री कोण होणार? हा सर्वात मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांच्या जागी सचिन पायलटचे नाव आघाडीवर आहे, त्यामध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत व्हेटो करू शकतात. राजस्थानच्या मुख्यमंत्र्याबाबत काँग्रेस पक्षाला अत्यंत सावधगिरीने निर्णय घ्यावा लागेल, असे गेहलोत यांनी म्हटले आहे. यामध्ये आमदारांचे मतही महत्त्वाचे ठरणार आहे.

हे ही वाचा:

‘ज्यांना दूध पाजले म्हणता त्या शिवसैनिकांचा त्याग, मेहनत आहे पक्षवाढीत’

महाराष्ट्रात एनआयएच्या छापेमारीत २० जणांना अटक

पीएफआयवरील छाप्यानंतर अमित शहा-डोभाल का भेटले?

काँग्रेसच्या केरळमधील पदयात्रेत पोस्टरवर सावरकरांची छबी

 

गेहलोत यांनी मुख्यमंत्रिपद सोडल्यानंतर राजस्थानचे मुख्यमंत्री कोण होणार? याकडे देशातील सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, राजस्थानमध्ये मुख्यमंत्रीपदाची शर्यत तेव्हाच सुरू होईल, जेव्हा मुख्यमंत्री अशोक गेहलोत काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा अर्ज दाखल करतील. सचिन पायलट व्यतिरिक्त प्रदेश काँग्रेस अध्यक्ष गोविंद दोतासरा, मंत्री लालचंद कटारिया, सीपी जोशी, बीडी कल्ला आणि भंवर जितेंद्र असे अनेक नेते या शर्यतीत येऊ शकतात असे म्हटलं जात आहे

सचिन पायलटचे नाव मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना मान्य नसून ते आमदारांचे मत जाणून घेतल्यानंतरच राजस्थानच्या मुख्यमंत्र्याच्या नावाची निवड करतील. मुख्यमंत्री अशोक गेहलोत स्वत: राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यावर त्यांची गोष्ट कोणी टाळू शकणार नाही. यामुळेच २७ सप्टेंबरला राजस्थानचे आमदार आणि मंत्री दिल्लीत पोहोचणार आहेत . मुख्यमंत्री गेहलोत थेट मंत्री-आमदारांना दिल्लीत बोलावून काँग्रेस हायकमांडला सांगतील की राजस्थानमध्ये आमदारांचे मत अधिक महत्त्वाचे ठरणार आहे. एक प्रकारे ते गेहलोत यांचे शेती प्रदर्शन असेल अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे

Exit mobile version