भाजपला माझा प्रामाणिकपणा दिसला म्हणून तिकीट मिळाले!

पंतप्रधान मोदींपुढे बाकी पक्षांचा परफॉर्मन्स फिका, अशोक चव्हाण

भाजपला माझा प्रामाणिकपणा दिसला म्हणून तिकीट मिळाले!

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्ष सोडून भाजपात प्रवेश केला.भाजप पक्षात प्रवेश केल्यानंतर अशोक चव्हाण यांना राज्यसभेची उमेदवारी देखील मिळाली.अशोक चव्हाण यांनी भाजप पक्षात प्रवेश केल्याने विरोधक तर्क-वितर्क आणि आरोप करू लागले.मात्र, योग्य वेळ आल्यानंतर योग्य बोलेन असे अशोक चव्हाण म्हणाले होते.यानंतर अशोक चव्हाण यांनी हिंदुस्थान टाइम्सला एक मुलाखत दिली.भाजप पक्षात प्रवेश केल्यानंतर त्यांची ही पहिलीच मुलाखत होती.या मुलाखतीत त्यांनी सविस्तर आणि स्पष्ट भूमिका मांडली.

हिंदुस्थान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत काँग्रेस पक्षाच्या भूमिकेवर बोट ठेवत अशोक चव्हाण म्हणाले की, मी अचानक निर्णय घेतला नाही आणि लोक मला घालवायला बसले होते असे देखील न्हवते. मात्र, पक्ष निवणुकीसाठी तयार न्हवता, लोकसभेच्या निवडणुकीसाठी जशी तयारी पाहिजे तशी गेली दोन वर्ष मला दुर्देवानं राज्यात दिसली नाही.तसेच मी जर काँग्रेस पक्षात राहिलो असतो तर माझा वेळ आणि माझी मेहनत ही वाया गेली असती, त्यामुळे मी एक चांगला पर्याय निवडला. मलाही राष्ट्रीय स्तरावर काम करण्याची संधी मिळते. पंतप्रधान मोदी हे उत्कृष्ट काम करत आहेत जे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर दिसून येत आहे. विरोधक (दुसरीकडे) भडकत आहेत, असे अशोक चव्हाण म्हणाले.

केंद्रीय यंत्रणांच्या दबावामुळे तुम्ही राजीनामा दिल्याचे काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे, असा सवाल केल्यानंतर अशोक चव्हाण म्हणाले की, आदर्श प्रकरणाबाबत माझ्याविरुद्ध न्यायालयात एकही खटला नाही. मी आधीच बोललो आहे की, हा एक राजकीय अपघात होता.मी यातून गेलो आहे.राजकीयदृष्ट्या हे मुद्दे निर्माण केले गेले आहे आणि केंद्रात आणि राज्यात काँग्रेसची सरकारे असताना हे सर्व घडले आहे.तसेच माझ्यावर आरोप करण्यापेक्षा पक्षातील गोष्टी या पातळीवर का पोहोचल्या आहेत, याचे आत्मपरीक्षण करावे, असे अशोक चव्हाण म्हणाले.

हे ही वाचा:

मणिपूरमध्ये पुन्हा संघर्ष; गाड्या पेटवल्या, एकाचा मृत्यू!

‘सूर्यकुमार यादवमुळे मुलाचे पदार्पण पाहू शकलो’

‘ती माझी चूक होती’

‘हिंसेला माफी नाही, कोणतीही हिंसा अस्वीकारार्ह’

काँग्रेस पक्षाने तुम्हाला खूप काही दिले हे नक्की. दोन दशकांहून अधिक काळ तुम्ही मंत्री, मुख्यमंत्री, प्रदेश काँग्रेस अध्यक्ष, आणि तरीही पक्षाला तुमची गरज असताना तुम्ही ते सोडलं?,असा प्रश विचारला असता अशोक चव्हाण म्हणाले की, इंडिया आघाडीमध्ये काय चालले आहे, तुम्ही पाहात आहात. पक्षात काही घडत नव्हत, पक्षाच्या भविष्यावर आमचे भविष्य अवलंबून आहे. मी पक्षासाठी कमी केले आहे का? मी महाराष्ट्रात ८२ जागा निवडून आणल्या होत्या, मुख्यमंत्री असताना. १६-१७ खासदार निवडून आणले होते. जेंव्हा पक्षाने संधी दिली तेंव्हा मी तसे आऊटपूटही दिले आहे.

बैठकीतून शिबीरातून काहीही साध्य होत नसते, तुम्हाला लोकांशी संपर्क करावा लागतो. वेळोवेळी सांगून सुद्धा काही बदल झालेले मला दिसले नाही. म्हणून मग सांगून उपयोग होत नसल्याने सांगणे सोडून दिले. भाजपला मी पक्षासाठी प्रामाणिकपणे काम करणारा माणूस वाटलो असेल, म्हणून त्यांनी आल्याबरोबर मला राज्यसभेत संधी दिली, असे अशोक चव्हाण म्हणाले.

पंतप्रधान मोदींची प्रशंसा करताना अशोक चव्हाण म्हणाले की, पंतप्रधान मोदी हे उत्कृष्ट काम करत आहेत जे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर दिसून येत आहे. इन्फ्रास्ट्रक्टचर डेव्होलोपमेंट चांगले आहे. रोडवेज, एअरवेज चांगले केले आहे. त्यांच्यापुढे बाकी पक्षांचा परफॉर्मन्स फिका आहे.मी मराठवाड्यात झोकून देऊन काम करेन, असे अशोक चव्हाण म्हणाले.

Exit mobile version