अशोक चव्हाणांनी ‘कमळ’ हाती घेतले

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा हात सोडत भाजपामध्ये प्रवेश केला

अशोक चव्हाणांनी ‘कमळ’ हाती घेतले

राज्याच्या राजकारणात सध्या मोठ्या घडामोडी घडत असून राज्यात काँग्रेसला एकामागून एक तीन मोठे धक्के बसले आहेत. मिलिंद देवरा, बाबा सिद्दीकी आणि आता माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे. यानंतर त्यांनी दोन दिवसात राजकीय भूमिका स्पष्ट करणार असल्याचे म्हटले होते मात्र, त्यांनी मंगळवार, १३ फेब्रुवारी रोजी माजी आमदार अमर राजूरकर यांच्यासह भाजपामध्ये पक्ष प्रवेश केला. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला आहे.

गेली तीन दशकं काँग्रेस पक्षाच्या विस्तारासाठी काम करणारे आणि काँग्रेसी विचारांनी प्रभावित असणारे राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा हात सोडत भाजपामध्ये प्रवेश केला. चव्हाण यांचे समर्थक अमर राजूरकर यांनीही भाजपात प्रवेश केला. या पक्ष प्रवेशावेळी अशोक चव्हाण यांचे समर्थक मोठ्या संख्येने भाजपा प्रदेश कार्यालयात उपस्थित होते.

मराठवाड्यात अशोक चव्हाण यांना मानणारा मोठा वर्ग असून ते राज्याचे दिवंगत मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे सुपुत्र आहेत. त्यामुळे मराठवाडा आणि विशेष म्हणजे नांदेडमध्ये त्यांचे समर्थक आहेत. हिंगोली, लातूर आणि नांदेड लोकसभा मतदारसंघातील राजकारणात अशोक चव्हाण यांचा होल्ड आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत अशोक चव्हाण यांनी कॉंग्रेसला दिलेला डच्चू हा मोठा धक्का मानला जात आहे. काँग्रेस आणि महाविकास आघाडीसाठी हा मोठा दणका असल्याचे बोलले जात आहे.

हे ही वाचा:

पाकिस्तानवर कर्जाचा वाढता बोजा; गेल्या वर्षीच्या तुलनेत २७ टक्क्यांनी वाढ

जम्मू-काश्मीरच्या माजी आमदार शहनाज गनई यांचा भाजपमध्ये प्रवेश!

सरफराज खान याचे कसोटी पदार्पण निश्चित

इंडोनेशियातील फुटबॉल सामन्यादरम्यान खेळाडूवर वीज कोसळली

अशोक चव्हाण यांच्यावर फार पूर्वीपासून काँग्रेसी विचारांचा प्रभाव होता. अशोक चव्हाण यांचे वडील शंकरराव चव्हाण हे देखील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. पुणे विद्यापीठात शिकत असताना अशोक चव्हाण हे विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी बनले. विद्यार्थी प्रतिनिधी ते राज्याचे मुख्यमंत्री असा त्याचा राजकीय प्रवास राहिला आहे.

Exit mobile version