भाजपा आमदार आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिलं आहे. शेलार यांच्या या पत्रामुळे राजकीय विश्लेषकांच्या भुवया नक्कीच उंचावल्या आहेत.
कारण शेलार यांनी त्यांच्या पत्रातून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा राजशिष्टाचारानुसार सन्मान करण्याबाबतची विनंती मुख्यमंत्र्यांना केली आहे.
“दि.१६ आक्टोबरला शासनातर्फे होणाऱ्या “प्रबोधनमधील प्रबोधनकार” या ग्रंथ प्रकाशनाच्या कार्यक्रमात प्रबोधनकारांच्या कुटुंबातील सदस्यांचा राजशिष्टाचारानुसार सन्मान करण्याबाबतची नम्र विनंती मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांना पत्राव्दारे केली!” असं ट्विट आशिष शेलार यांनी केलं आहे.
दि.16 आक्टोबरला शासनातर्फे होणाऱ्या "प्रबोधनमधील प्रबोधनकार" या ग्रंथ प्रकाशनाच्या कार्यक्रमात प्रबोधनकारांच्या कुटुंबातील सदस्यांचा राजशिष्टाचार नुसार सन्मान करण्याबाबतची नम्र विनंती मा.मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांना पत्राव्दारे केली! @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis @ChDadaPatil pic.twitter.com/8JMDd1Xbqe
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) October 15, 2021
१६ आक्टोबरला शासनातर्फे होणाऱ्या “प्रबोधनमधील प्रबोधनकार” या ग्रंथ प्रकाशनाच्या कार्यक्रमात विशेषतः राज ठाकरेंचा राजशिष्टाचारानुसार सन्मान व्हावा याबद्दल आशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. राजकीय मतभेद विचारात न घेता प्रबोधनकारांचे नातू असलेल्या राज ठाकरेंना या कार्यक्रमात राजशिष्टाचारानुसार सन्मान देण्यात यावा, अशी विनांती त्यांनी या पत्रातून केली.
हे ही वाचा:
यांना हिरक महोत्सव आणि अमृत महोत्सव मधला फरक कळत नाही हे कसले विचारांचे सोने लुटणार?
भाजपाच्या इशाऱ्यानंतर तामिळनाडू सरकारने मंदिरं उघडली
‘घोटाळेबाज सरकारला घालविण्यासाठी अंदमान निकोबार जेलमध्येही जाईन!
उद्धव ठाकरे म्हणजे लायसन्स नसलेले ड्रायव्हर, शिवसेनेचाच नेता असे का म्हणाला?
शेलार यांनी पत्रात लिहिले आहे की, मी ज्या ज्या वेळी राज ठाकरे यांना भेटलो तेव्हा त्यांच्याकडून प्रबोधनकारांचे जाज्ज्वल्य विचार ऐकले आहेत. प्रबोधनकारांच्या विचारांचा वारसा, व्यासंग असलेले त्यांचे नातू राज ठाकरे यांना राजशिष्टाचारानुसार आमंत्रित करून एक चांगला संदेश शासनाला देता आला असता.