रविवार, १ मे रोजी महाराष्ट्रात कामगार दिन साजरा करण्यात आला. कामगार दिनानिमित्त राजकीय पक्षांच्या सभा झाल्या. त्यावरून आज राजकीय वातावरण तापलेले आहे. भारतीय जनता पार्टीचे नेते आशिष शेलार यांची आज, २ मे रोजी पत्रकार परिषद झाली. या परिषदेत त्यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर टीकास्त्र डागले आहे. राजकारण ही तुमच्या डोक्यात घुसलेली घाण आहे, ती आधी साफ करा असा घणाघात शेलारांनी शिवसेनेवर केला आहे. त्याबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेसवरही त्यांनी टीका केली आहे.
शिवसेना म्हणतेय त्यांनी बाबरी मशीद पाडली. त्यावरून शेलार यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. ते म्हणाले, बाबरी मशीद पाडण्यासाठी तुमच्या जन्माआधीपासून आंदोलन सुरु होते. शिवसेनेच्या नेत्यांना बहुतेक बुध्दिदोष झालाय, अशी गंभीर टीका शेलारांनी केली आहे. पुढे ते म्हणाले, प्रत्येक गोष्टीत राजकारण आणण्याची यांना सवय लागली आहे. राजकरण ही तुमच्या डोक्यात घुसलेली घाण आहे, ती आधी साफ केली पाहिजे, अशी गंभीर टीका शेलारांनी शिवसेनवर केली आहे. आजच हे सरकार सूडबुद्धीने काम करत असल्याचे शेलार म्हणाले.
महापालिकेने मिठी निधीचा प्रकल्प केला आणि त्यांनी असे दाखवून दिले की, त्यांनी जागतिक काहीतरी काम केले आहे. असे म्हणत शेलारांनी पंतप्रधानांनी केलेली कामे सांगितले जी एवढी कामे करून सुद्धा जगजाहीर केलेले नाही. ते म्हणाले, महापालिकेने मिठी नदीचा प्रकल्प केला त्याचे एवढे कौतुक केले. भाजपाने पेट्रोलच्या विषयावर काम केले, करामध्ये सवलत दिली आहे. तरीही ठाकरे सरकारने पेट्रोल डिजेलवरचा वॅट कमी केला नाही. यामुळे जनतेचे नुकसान झालं, याची पंतप्रधान मोदींनी आठवण देखील करून दिली असता त्यावर यांनी लगेच टीका केल्या. जगात तेलाचे संकट सुरू असताना खुद्द पंतप्रधान मोदींनी रशियाकडून कच्च तेल घेतले. ८० कोटी भारततीयांना सातत्याने अन्नाचा पुरवठा पंतप्रधानांनी केला आहे.
हे ही वाचा:
‘उद्धव ठाकरे भगवे उतरवून हिरवे झालेत’
योगी सरकारने धार्मिक स्थळांवरून बेकायदा ५३ हजार ९४२ भोंगे उतरवले
स्पाईसजेट विमानाला लँडिंगवेळी अपघात; ४० जण जखमी
पंतप्रधान निघाले जर्मनी, डेन्मार्क, फ्रान्सला
मुंबई बॉम्बस्फोटाबद्दल शेलार म्हणाले, बॉम्बस्फोट करणाऱ्यांबरोबर शिवसेना आईसक्रिम खाण्याचा कायर्क्रम करते. आरोपीचे शिवसेना समर्थन करते, अशी टीका त्यांनी केली आहे. पुढे ते म्हणाले, इतिहास बदलता येत नाही. आणि संजय राऊत्यांच्यात इतिहास बदलण्याची ताकद नाही, मुळात त्यांना इतिहासच माहिती नाही, असा टोला त्यांनी राऊतांना लगावला. उद्धव ठाकरेंना आम्ही भावासारखे मानले मात्र ते धूर्त निघाले. टोमणे मरण,कुसकट बोलणं हे मुख्यमंत्र्यांना शोभत नसल्याचे शेलार म्हणाले. तसेच राष्ट्रवादीचं घड्याळ बंद पडल्यामुळे त्यामुळे त्यांना सगळीकडे वेळ दिसतेय, अशी शेलारांनी राष्ट्रवादीवर टीका केली.