‘परमबीर सिंग पळून जाण्यास महाराष्ट्र सरकार जबाबदार आहे’

‘परमबीर सिंग पळून जाण्यास महाराष्ट्र सरकार जबाबदार आहे’

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अटक झाल्यावर त्यांच्यावर आरोप करणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग हे मात्र अजूनही फरार आहेत. यावरूनच आता भाजप नेते आशिष शेलार यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधत परमबीर सिंग हे गायब होण्यामागे महाविकास आघाडी सरकार कारणीभूत असल्याचा आरोप केला आहे.

परमबीर सिंग राज्यातून पळून गेले कसे याचे उत्तर नवाब मलिक यांनी द्यायला हवे, असे आशिष शेलार यांनी म्हटले आहे. परमबीर सिंग पळून गेले याला महाराष्ट्र सरकार जबाबदार आहे. परमबीर सिंग पळून गेले, मात्र त्यांचे निवासस्थान तर इथेच होते ना, असे शेलार म्हणाले. महाराष्ट्र सरकार त्यांना पळायला मदत करत असल्याचा धक्कादायक आरोपही आशिष शेलार यांनी केला आहे.

हे ही वाचा:

आदित्यजी बघा, करंज्यात १०० हून अधिक खारफुटीची झाली कत्तल!

आता उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या मालमत्तेवर टाच

‘वसुली कांड प्रकरणातील ही तर प्याद्याची अटक’

धनत्रयोदशी: दिवाळी खरेदीच्या उत्साहाचा दिवस!

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त ज्या देशात आश्रयाला जातील तिथे त्यांना मदत करण्याचा प्रयत्न राज्य सरकार करत आहेत, असे शेलार म्हणाले. परमबीर सिंग यांच्याकडे या सरकार विरोधात बरीच माहिती आहे त्यामुळेच सरकार त्यांना पळायला मदत करत असल्याच्या दावा शेलार यांनी केला आहे.

नवाब मलिक यांची आणि ज्यांच्यावर त्यांनी आरोप केले अशा त्या दोघांचीही नार्कोटेस्ट करावी, असेही आशिष शेलार म्हणाले. जे मंत्री सरकारची ढाल पुढे करून पोलीस यंत्रणा समोर जात नाही आहेत किंवा कोर्टात जात नाहीत त्यामुळे नवाब मलिक यांची नार्कोटेस्ट करायला हवी. ज्यांच्यावर गंभीर आरोप केले त्यांना आणि ज्यांनी आरोप केले त्यांना समान न्याय राज्य सरकारने द्यायला हवा.

Exit mobile version