देशामध्ये जर खोटं बोलण्याची स्पर्धा झाली असती, तर उद्धव ठाकरेंचा पहिला नंबर आला असता, अशी टीका मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे. जागर मुंबईचा या अभियानात दहिसरमध्ये आशिष शेलार बोलतं होते.
उद्धव ठाकरे यांनी बुलढाण्यामध्ये शेतकरी मेळावा घेतला. त्यावेळी त्यांनी शिंदे गट आणि भाजपा यांच्यावर टीका केलं होती. आता मी जर मुख्यमंत्री असतो तर महिलांची बदनामी करणाऱ्या मंत्र्यांला मंत्रिमंडळातून लाथ मारून बाहेर काढले असते, असे विधान उद्धव ठाकरेंनी केले होते. त्यांच्या या विधानाला आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
ते म्हणाले, मी मुख्यमंत्री असतो, तर महिलांची बदनामी करणाऱ्या मंत्र्याला मंत्रिमंडळातून लाथ मारून बाहेर काढले असते, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. मी विचार केला खोटे बोलण्याची स्पर्धा लावली, तर प्रथम क्रमाकांचे बक्षिस उद्धव ठाकरेंना मिळेल. इतके धादांत खोटे ते बोलतात. महिलांचा अपमान कुणीच करू नये, आम्हीही त्याचा निषेध करतो. पण त्यांच्या मंत्रिमंडळातील एक मंत्री दाऊदच्या बहिणीबरोबर व्यवहार करतो. काळ्या पैशाने तिची प्रॉपर्टी विकत घेतो, तोच काळा पैसा बॉम्बस्फोटात वापरलो जातो. मग त्या मंत्र्याला मंत्रिपदावरून काढावेसे उद्धवजींना का वाटले नाही? असा सवाल शेलारांनी उपस्थित केला.
हे ही वाचा :
सूरतमध्ये केजरीवालांच्या प्रचार रॅलीमध्ये दगडफेक
नाशिक आश्रमातील मुलींवरील अत्याचारप्रकरणी चित्रा वाघ यांनी घेतली कठोर भूमिका
शिवडीचा किल्ला अतिक्रमणातून मुक्त करणार
राहुल गांधींविरोधात रणजीत सावरकर यांचा नोंदविला जबाब
उद्धव ठाकरे यांनी श्रद्धा हत्याकांडावर भाष्य करण्याचे टाळले होते. त्यावर आशिष शेलार म्हणाले, मुस्लिम मतांचे राजकारण करण्यासाठी त्यांनी श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात साधा निषेधही व्यक्त केला नाही. मराठी आणि मुस्लिमांना फसवण्याचे काम उद्धवसेनेकडून सुरू असल्याचे शेलार म्हणाले. तसेच, आम्ही कुठल्याही धर्माच्या, जातीच्या विरोधात नाही. आम्ही ‘सबका साथ सबका विकास’ आहोत, असंही आशिष शेलार यांनी म्हटले आहे.