ठाकरे गटाचे नेते आणि प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर भाजपा मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांनी काही सवाल करत टीकास्त्र डागलं आहे. उद्धव ठाकरे आणि त्यांच्या गटाकडून सातत्याने भाजपावर टीका केली जाते यावर आता आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. “महाराष्ट्र आता रस्त्यावर होर्डिंग लाऊन उबाठाला थेट विचारतोय. औरंगाबाद की छत्रपती संभाजी महाराज नगर? उस्मानाबाद की धाराशिव? अहमदनगर की पुण्यश्लोक अहिल्यानगर? काँग्रेस की हिंदुत्व? कबर की स्मारक? आणि औरंगजेब की सावरकर? म्हणून शब्दांची कोटी न करता. मर्द, खंजीर असले शब्द न वापरता. उबाठा प्रमुखांनी महाराष्ट्राला स्पष्ट शब्दात सांगावे. यापैकी नेमके काय? की दोन्ही? नाही तर लहानपणीचा खेळ. एवढं एवढं पाणी आणि गोलगोल ‘गाणी'” असे सवाल आशिष शेलार यांनी आपल्या ट्विटमधून उपस्थित केले आहेत.
महाराष्ट्र आता रस्त्यावर होर्डिंग लाऊन उबाठाला थेट विचारतोय…
◆ औरंगाबाद की छत्रपती संभाजी महाराज नगर?
◆ उस्मानाबाद की धाराशिव?
◆ अहमदनगर की पुण्यश्लोक
अहिल्यानगर?
◆ काँग्रेस की हिंदुत्व?
◆ कबर की स्मारक?
आणि
◆ औरंगजेब की सावरकर?
म्हणून
शब्दांची कोटी न करता..
मर्द,…— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) June 23, 2023
हे ही वाचा:
‘भारतात भेदभावासाठी जागा नाही’
‘टायटन’ पाणबुडीवरील ते पाचजण ‘खरे शोधक’ होते
बेपत्ता टायटन पाणबुडीतील ‘त्या’ पाच जणांचा मृत्यू
‘कॅस्ट्रोफिक इम्पोशन’मुळे पाणबुडीचा अपघात
नुकतंच उद्धव ठाकरेंनी महापालिकेवर आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात विराट मोर्चा काढणार असल्याचे सांगितले होते. महापालिकेच्या कारभारावर उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन प्रश्न उपस्थित केले होते. निवडणूक घेण्यात याव्यात अशीही मागणी उद्धव ठाकरेंनी केली होती. महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या मुद्द्याला वाचा फोडण्यासाठी मोर्चा काढणार असल्याचे उद्धव ठाकरेंनी सांगितले.