25 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरराजकारण“राज्याचा जीव उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी घेतला”

“राज्याचा जीव उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी घेतला”

आशिष शेलारांची घाणाघाती टीका

Google News Follow

Related

राज्याचा जीव उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी घेतला आहे, अशी टीका करत भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि आमदार आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांवर निशाणा साधला आहे. राज्यातले उद्योग तुम्ही बाहेर काढले, नाणारला तुमचा विरोध, नवीन विमानतळाला विरोध करणारे तुम्ही आहात आणि राज्याचा जीवसुद्धा तुम्ही घेतला आहे, अशी टीका आशिष शेलारांनी केली.

“पत्राचाळ घोटाळा करून आमचा पक्ष चालत नाही. कोविड खिचडी घोटाळा करून आमचा पक्ष चालत नाही. आम्ही आमच्या पक्षाच्या खर्चाचा हिशेब निवडणूक आयोगाकडे देत असतो,” असा सणसणीत टोला आशिष शेलारांनी संजय राऊत यांना लगावला आहे. शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघनखे भारतात आणण्याचा तीन  वर्षांचा करार करण्यात आला आहे. मुंबई, सातारा, नागपूर आणि कोल्हापूरमध्ये ही वाघनखे नेण्यात येणार आहेत. राज्यात जे आजपर्यंत टवाळखोर होते पण आज ते शंकेखोर झाले आहेत. ज्यांनी प्रश्न उपस्थित केले त्या शंकाखोरांचा कोथळा आम्ही बाहेर काढणार आहोत, अशी टीका आशिष शेलारांनी केली.

हे ही वाचा:

शहीद चंद्रशेखर आझाद यांच्या चकमकीची नोंद सापडली

इस्रायलकडून वचपा; हमास सैन्य प्रमुखाच्या वडिलांच्या घरावर बॉम्ब हल्ला

दादा भुसेंचा सुषमा अंधारेंना इशारा!

इस्रायलच्या गुप्तचर यंत्रणेला आठवला मुंबईवरील २६/११ चा दहशतवादी हल्ला

“विशिष्ट वर्गाची मते मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. शंका उपस्थित करणाऱ्यांना इतिहास नको, वापरलेली वाघ नख नको हे सर्व नियोजित आहे. आजही मोहम्मद अली रोडवर बोर्ड आहेत त्यावर कुणी काळे फासत नाही. गुजराती शब्दावर तोडफोड करत आहेत. आव्हान आहे मोहम्मद अली रोडवर उर्दू आणि पारशी बोर्ड आहेत ते तोडफोड करून दाखवा,” अशी टीका त्यांनी ठाकरे गटावर केली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा