मुंबईत सोमवार, १ मे रोजी महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा होणार आहे. ही वज्रमूठ सभा मुंबईतल्या वांद्रे- कुर्ला संकुलात आयोजित करण्यात आली असून सभेच्या जागेवरून भाजपा नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी महाविकास आघाडीवर टीकास्त्र डागलं आहे.
आशिष शेलार यांनी महाविकास आघाडीवर टीका करणारं ट्वीट करत वज्रमुठ सभेवर निशाणा साधला आहे. जे मैदान ग्राहकोपयोगी वस्तूंच्या प्रदर्शनालाही कमी पडतं, जिथे एकट्या भाजपाची सभा असते तेव्हा व्यवस्थेला जे मैदान वापरावं लागतं, अशा बीकेसीतील सर्वात छोट्यातील छोट्या मैदानात तीन पक्षांची सभा होत आहे. ही वज्रमुठ सभा म्हणजे मैदान छोटे, आकडे खोटे आणि राऊतांसारखे भोंगे फक्त मोठे, अशी चपराक आशिष शेलार यांनी लगावली आहे.
शिवाजी पार्क सोडले, बीकेसीतील मोठी मैदानं घेणं टाळलं. उबाठाचा प्रवास “ईश्वरनिष्ठांकडून कम्युनिस्टांकडे” असल्याने भविष्यात नरे पार्कातच सभा होतील असं वाटतंय, अशी खोचक टीकाही आशिष शेलार यांनी केली आहे.
उबाठाचा प्रवास 'ईश्वरनिष्ठांकडून कम्युनिस्टांकडे' असल्याने भविष्यात त्यांच्या नरे पार्कातच सभा होतील असं वाटतं.@rautsanjay61 @OfficeofUT @AUThackeray #Mumbai pic.twitter.com/KSJIirwDo3
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) May 1, 2023
हे ही वाचा:
देशद्रोह कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली
सहा महिने वाट न पाहताही घटस्फोट दिला जाऊ शकतो
केंद्र सरकारचा डिजिटल स्ट्राईक , पकिस्तानशी संबंधित १४ मेसेंजर ऍपवर बंदी
‘महाविकास आघाडीला शरीया कायदा लागू करायचा आहे’
महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा होणार असून त्यासाठी मैदान संपूर्ण भरणार असल्याचा दावा अनेक महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे. मात्र, मुळातच कमी क्षमतेचे मैदान सभेसाठी निवडल्याने या मैदानावरून महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीका करण्यात येत आहे.