मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे बारामतीमध्ये ‘नमो रोजगार मोळाव्या’च्या शासकीय कार्यक्रमाला जाणार आहेत. या कार्यक्रमाचे शरद पवारांना आमंत्रण नसल्याची चर्चा होती. अशातच शरद पवार यांनी या तिघांना त्यांच्या निवासस्थानी जेवणाचे निमंत्रण दिले आहे. पवार गटाचे नेते जयंत पाटील स्वतः हे निमंत्रण देऊन गेले. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. अशातच भाजपाचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांनी ट्वीट करून ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवला आहे.
आशिष शेलार यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, “मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आणि शरद पवार यांनी राज्यात संघर्षातही महाराष्ट्राची प्रगल्भ राजकीय परंपरा जतन करणारे वातावरण निर्माण केले, म्हणूनच बारामतीतून भोजनाचे आमंत्रणाचे पत्र आले आहे. याबाबत काय निर्णय होईल तो होईल. मनसेचे नेते राज ठाकरे हे सुद्धा वारंवार परंपरा जतन करीत आले आहेत. महाराष्ट्रातील जवळपास सगळी राजकीय घराणी ही परंपरा वर्षोनुवर्षे जतन करीत आली आहेत. फक्त महाराष्ट्रात एक राजकीय बाप-बेटे आहेत, त्यांनी त्यांच्या घरची वडिलोपार्जित ही प्रथा परंपरा बंद करुन टाकली. त्यांचा नारा एकच आहे आणि तो म्हणजे मी अहंकारी, माझे कुटुंब माझी जबाबदारी. पेग, पेंग्विन, पार्टीसाठी कमला मिल बरी” असा खोचक टोला आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.
◆मा. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आणि मा. शरद पवार यांनी महाराष्ट्रात संघर्षातही महाराष्ट्राची प्रगल्भ राजकीय परंपरा जतन करणारे वातावरण निर्माण केले, म्हणूनच बारामतीतून भोजनाचे आमंत्रणाचे पत्र आलेय.
◆ याबाबत निर्णय काय होईल तो होईल पण…
◆ मनसेचे नेते राज ठाकरे…
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) March 1, 2024
हे ही वाचा:
पुतीन यांची पाश्चिमात्य देशांना अण्वस्त्र युद्धाची धमकी
वायनाडमध्ये कॉलेजवयीन विद्यार्थ्याची आत्महत्या; डाव्या चळवळीतील संघटनेच्या सहा सदस्यांना अटक
ब्रिटनस्थित गँगस्टरने स्वीकारली नाफेसिंग राठी यांच्या हत्येची जबाबदारी
ढाक्यात सातमजली इमारतीला आग; ४३ जणांचा मृत्यू
बारामतीत नमो रोजगार मोळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. बारामतीतल्या नमो महारोजगार मेळाव्याच्या कार्यक्रमातल्या पत्रिकेमध्ये शरद पवारांचं नाव नसल्याचेही समोर आले होते. राज्य सरकारने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रम पत्रिकेत खासदार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे आणि राज्यसभेच्या खासदार वंदना चव्हाण यांचं नाव आहे. नव्या सुधारित पत्रिकेत शरद पवारांचे नाव लिहिण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.