26 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरराजकारण'ठाकरे सरकारची मोड्स ऑपरेंडी ठरलेली आहे'

‘ठाकरे सरकारची मोड्स ऑपरेंडी ठरलेली आहे’

Google News Follow

Related

गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात शिवेसना विरुद्ध भाजप असा राजकीय वाद सुरू आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि आमदार नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यावरून आता आमदार आशिष शेलार यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. शिवसेनेचं टूल कीट काय आहे हे त्यांनी सांगून टाकलं आहे. त्यांनी नाशिक दौऱ्यादरम्यान ठाकरे सरकारवर टीका केली आहे.

आशिष शेलार म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून ठाकरे सरकारची मोड्स ऑपरेंडी ठरलेली आहे. त्यात एखाद्या व्यक्तीविरोधात सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल करायची. त्यातून बदनामी करायची. दुसरीकडे महिला आघाडीने करावाईची मागणी करायची. महापौरांनी महापौर म्हणून नाही, तर पक्षाच्या नेत्या म्हणून काम करायचे, अशी घाणाघाती टीका आशिष शेलार यांनी केली आहे.

आशिष शेलार यांनी काँग्रेसवर देखील टीका केली आहे. काँग्रेस स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करते. त्यांचे वर्तन इंग्रजांच्या भावासारखे आहे. या काँग्रेसच्या समर्थनासाठी शिवसेनेने सावरकरांचे विचार आणि हिंदुत्व सोडल्याचा आरोपही त्यांनी केला.

हे ही वाचा:

भाजपा खासदार जेपी नड्डा यांचे ‘या’ कारणासाठी ट्विटर हॅक

एल्फिन्स्टनचा उड्डाणपूल मराठी माणूस होणार का गुल?

मुंबईची बत्ती गुल

पंतप्रधान नरेंद्र मोदी, झेलेन्स्की यांच्यातील चर्चेनंतर भारताची ही भूमिका

नारायण राणे आणि नितेश राणे यांच्यावर दाखल केलेल्या गुन्ह्यानंतर ठाकरे सरकारची सूडबुद्धी दिसून आल्याचे आमदार अतुल भातखळकर म्हणाले. नारायण राणे आणि नितेश राणे यांनी दिशा सालियन प्रकरणावरून अनेक प्रश्न उपस्थित केले होते. त्यामुळे आपल्या मुलीची बदनामी थांबवावी म्हणून सालियन कुटुंबीयांनी राज्य महिला आयोगाकडे तक्रार करून मदतीची मागणी केली होती. त्याची दखल घेऊन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी या प्रकरणी पोलिसांकडून अहवाल मागितला होता. पोलिसांनी हा अहवाल दिला असून त्यात दिशाच्या पोस्टमार्टम अहवालामध्ये तिच्यावर कोणताही अत्याचार झाला नसून मृत्यूवेळी ती गरोदर नसल्याची नोंद आहे. त्यानंतर आता सालियन कुटुंबीयांनी नारायण राणे आणि नितेश राणे यांच्याविरोधात खोटे आरोप केल्याची तक्रार केली होती. पोलिसांनी या प्रकरणी राणे पितापुत्रांविरोधात गुन्हा दाखल करून घेतला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा