राज्यात सध्या विरोधीपक्ष आणि सत्ताधारी यांच्यात चांगलेच राजकीय युद्ध रंगलेले आहे. २ एप्रिल गुढीपाडव्याला राज्यात अनेक ठिकाणी शोभायात्रेचे आयोजन केले जाते मात्र यंदा शोभायात्रेला परवानगी देण्यावरून राज्य सरकारमध्ये संभ्रम दिसून येतोय. यावरून आता भाजपाचे नेते आणि आमदार अशिष शेलार यांनी ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.
गुढीपाडवा नववर्षाच्या शोभा यात्रा निघतात. राम जन्माला देखील मिरवणूका निघतात, पण यांच्या परवानगीची स्पष्टता नसल्याचे आशिष शेलारांनी म्हटले. मुंबई पोलिसांनी आता कहर केला आहे. १० मार्च ते ८ एप्रिल पर्यंत त्यांनी सरळ जमावबंदीचे आदेश दिले आहेत. याचे कारण असे दिले आहे की, आतंकवादी हे ड्रोन किंवा अन्य माध्यमांचा वापर करून हल्ला करणार आहेत. त्यांच्याकडे ही माहिती असेही खरं काय ते माहित नाही.
राम नवमी आणि गुडीपाडव्याला १४४ चा वापर केला आहे. हिंदू सणांना परवानगी देताना यांच्या हाताला लकवा मारतो का? असा संतप्त सवाल आशिष शेलार यांनी उपस्थित केला आहे. शिवसेना कार्यक्रम करते तेव्हा ही कारणं येत नाहीत. हॅप्पी ट्रीट आणि वांद्रे वंडर लँड चालतं. मात्र, गुढीपाडवा चालत नाही. यापुढे आम्ही हे आम्ही चालू देणार नाही, असे अशिष शेलार म्हणाले.
हे ही वाचा:
हिंदू अल्पसंख्याक प्रकरणाचे शपथपत्रच सॉलिसिटर जनरलनी पाहिले नाही
उद्योगपती प्रशांत कारुळकर यांचा समाजभूषण पुरस्काराने सन्मान
भाजपाचा विजय साजरा करणाऱ्या मुस्लिम युवकाला उत्तर प्रदेशात केले ठार!
६ एप्रिल रोजी भाजपाचा वर्धापान दिन असतो. याचे औचित्य साधून अखिल भारतीय स्तरावर काही कार्यक्रम ठरवण्यात आले आहेत. भाजपा हा देशातील जास्त सदस्य असलेला पक्ष आहे, सर्वाधिक जनसमर्थन मिळालेला महारष्ट्रातला एकमेव पक्ष आहे, असेही ते म्हणाले. मुंबईतील प्रत्येक पोलीस ठाण्यात म्हणजेच प्रत्येक शक्तीकेंद्रावर कार्यक्रम करणार आहोत. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सकाळी पक्ष कार्यकर्त्यांना आणि नागरिकांना जाहीर संबोधन करणार असल्याचे आशिष शेलार म्हणाले.
महाराष्ट्र प्रदेश भाजपाचे प्रवक्ते ऍड. राजीव के पांडे यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली की, हिंदू सणांच्या बाबतीत महाविकास आघाडी सरकारची नेहमीच बोटचेपी भूमिका राहिली आहे. याआधी, मंदिरे उघडण्यावरून त्यांनी नकारघंटा वाजविली होती. आता गुढी पाडवा, राम नवमीच्या मिरवणुकांच्या बाबत स्पष्ट नियम नाहीत. उलट जमावबंदीचे आदेश त्या काळात आहेत. हे खपवून घेतले जाणार नाही.