‘पेंग्विनवर दिवसाला दीड लाख खर्च; पण लहान बाळासाठी यांना वेळ नाही’

‘पेंग्विनवर दिवसाला दीड लाख खर्च; पण लहान बाळासाठी यांना वेळ नाही’

वरळी येथील बीडीडी चाळीत ३० नोव्हेंबरला सिलेंडरचा स्फोट होऊन चार जण जखमी झाले होते. त्यांना मुंबईमधील नायर रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, केवळ रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे जखमींपैकी चार महिन्यांच्या मुलाला आपला प्राण गमवावा लागला होता. त्यावरून भाजपने सत्ताधारी शिवसेनेला धारेवर धरले होते. आज त्या मुलाच्या वडिलांचा मृत्यू झाला आहे. त्यावरून भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडले आहे.

बाळाचा मृत्यू, त्याच्या वडिलांचा मृत्यू आणि रुग्णालयातील दुरवस्था याचा निषेध आहे आणि यासाठीच आमच्या सर्व सदस्यांनी राजीनामा दिला. साडे चार हजार कोटी रुपये आरोग्य विभागाचे अर्थसंकल्प आहे, मग हा पैसा कुठे खर्च होतो ते मुंबईकरांनी विचारायचे नाही का? असा सवाल आशिष शेलार यांनी केला आहे. ७२ तास रुग्णालयात का पोहचला नाहीत, कुठे झोपला होता, असा सवाल त्यांनी विचारला.

राणीच्या बागेतील पेंग्विनवर दिवसाला सुमारे दीड लाख रुपये खर्च करतात, पेंग्विनला आमचा विरोध नाही. पण बाळासाठी तुम्ही ४५ मिनिटांत पोहचू शकत नाहीत का असा सवाल त्यांनी विचारला आहे. साडेतोड प्रश्न विचारल्यास तुम्हाला ते झोंबणार पण आम्ही असे प्रश्न विचारात राहणारच. हे जनतेचे प्रश्न आहेत.

हे ही वाचा:

यशवंत जाधव यांच्यावर सोमैय्यांनी फेकला मनीलॉन्ड्रिंग आरोपाचा बॉम्ब

ठाकरे सरकारच्या चुकीमुळे वाढले नारायण राणेंचे सुरक्षा कवच?

एटीएम पडले मागे; लोक करत आहेत घरबसल्या व्यवहार

चिडलेले शेतकरी शांत होऊन गेले! कंगनाने असे काय केले?

वरळीतील गणपतराव जाधव मार्गावरील कामगार वसाहतीत बीडीडी चाळीतील एका खोलीमध्ये ३० नोव्हेंबरला सकाळी गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. यामध्ये चार महिने वय असलेल्या एका तान्ह्या बाळासह पाच वर्षे वयाचा मुलगा, एक महिला आणि एक पुरुष असे चौघे जण भाजले होते. या चारही रुग्णांना नायर रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात प्रशासनाच्या आणि डॉक्टरांच्या निष्काळजीपणा, हलगर्जीपणा व दुर्लक्षामुळे सुरुवातीच्या एक तासापेक्षा जास्त वेळ डॉक्टरांनी कोणतेही उपचार न केल्यामुळे त्यातील छोट्या बालकाचा मृत्यू झाला होता आणि आता आज त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला आहे.

Exit mobile version