‘रखडलेल्या मेट्रो प्रकल्पामुळे मुंबईकरांचे होणारे नुकसान युवा सेनेने भरुन द्यावे’

‘रखडलेल्या मेट्रो प्रकल्पामुळे मुंबईकरांचे होणारे नुकसान युवा सेनेने भरुन द्यावे’

मुंबईतील बहुचर्चित मेट्रो प्रकल्प अजूनही रखडलेला आहे. मेट्रो कारशेडसाठी अजूनही जागा नक्की होत नसल्यामुळे हा प्रकल्प रखडला आहे. तर प्रकल्पाच्या खर्चातही वाढ होत आहे. यावरून भाजपा नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी शिवसेनेवर आणि महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.

“आरेत मेट्रो कारशेड करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाचे आदेश मान्य नाहीत. कांजुरमार्गच्या कारशेडसाठी स्वतःच नियुक्त केलेल्या समितीचा अहवाल अमान्य आहे. स्वतःच्या अहंकारातून मुंबईकरांचे १० हजार कोटींपेक्षा जास्त नुकसान केले. आरेतून कांजूरमार्गला आले आता म्हणे नव्या जागेत पुढे चला,” अशी घाणाघाती टीका आशिष शेलार यांनी केली आहे.

“मेट्रो लाईन तयार होत आल्या आहेत. स्थानकांची उभारणी होत आली आहे. मेट्रोचे डबे मुंबईत येऊन दाखल झाले आहेत. तरी कारशेडचा खेळखंडोबा सुरुच आहे,” असे टीकास्त्र आशिष शेलार यांनी युवा सेनेवर सोडले आहे. “तुमचा अहंकार ही मुंबईकरांची जबाबदारी आहे का?” असा संतप्त सवाल त्यांनी विचारला आहे. मुंबईकरांचे होणारे नुकसान युवा सेनेने भरुन द्यावे, असेही आशिष शेलार म्हणाले.

हे ही वाचा:

‘गंदा हे पर धंदा हे ये’

भारताने कसोटी जिंकली; श्रीलंकेवर एक डाव २२२ धावांनी विजय

भारतीय महिलांनी पाकिस्तानला नमवून केली वर्ल्डकपची दमदार सुरुवात

४३४; फिरकीपटू अश्विनकडून कपिल देव यांच्या विक्रमाशी बरोबरी

मुंबईच्या मेट्रो कारशेडसाठीच्या जागेचा वाद संपत नसून सुरुवातील देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना आरेच्या जंगलात कारशेडचा बनवण्याचा निर्णय देण्यात आला. त्यासाठी काही झाडेही तोडण्यात आली. मात्र, शिवसेना आणि पर्यावरण प्रेमींनी आरेत मेट्रोच्या कारशेडला विरोध केला. त्यानंतर राज्यात सत्तापालट झाल्यावर ठाकरे सरकारने आरेतल्या कारशेडला स्थगिती देत कारशेड कांजूर मार्गला करत असल्याचे जाहीर केले. मात्र, ही जागा केंद्र आणि राज्य सरकारच्या वादात सापडली असून केंद्राने या जागेवर दावा केला आहे. त्यामुळे हा प्रकल्प रखडला असून या प्रकल्पाच्या खर्चातही वाढ होत आहे.

Exit mobile version