‘ममता यांना हिंदू राष्ट्र मान्य नसेल तर शिवसेनेची भूमिका काय?’

‘ममता यांना हिंदू राष्ट्र मान्य नसेल तर शिवसेनेची भूमिका काय?’

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या सध्या मुंबईच्या दौऱ्यावर असून त्यांनी काल (३० नोव्हेंबर) शिवसेना नेते संजय राऊत आणि मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेतली. या दौऱ्यावरून राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून भाजप आमदार आशिष शेलार यांनी शिवसेनेला आणि महाविकास आघाडी सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे.

काल पर्यंत भिवंडी परिसरात बांगलादेशी नागरिकांविरुद्ध कारवाई केली जात होती. त्यामुळे या कारवाया थांबवण्यात याव्यात यासंबंधी विनंती करण्यासाठी तर ममता बॅनर्जी यांनी भेट घेतली नाही ना? असा सवाल आशिष शेलार यांनी विचारला आहे. त्यावरून मग बांगलादेशींविरुद्ध कारवाया होणार नाहीत याचे आश्वासन तर दिले गेले नाही ना? असाही सवाल त्यांनी विचारला आहे.

हे ही वाचा:

‘एमपीएससीच्या विविध प्रश्नांबाबात सरकारकडून केवळ घोषणाच आणि तोंडाची वाफ’

सर्व कोरोना रुग्ण समान आहेत, पण काही रुग्ण इतरांपेक्षा अधिक समान आहेत

पुलवामामध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा

राज्यात आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी ‘हे’ नियम लागू 

नात्यांच्या गोष्टी महाराष्ट्राला मान्य नाहीत. बांगलादेशींना घुसखोरीसाठी मदत कारणाऱ्यांचे आणि तुमचे नाते काय आहे, असा सवाल आशिष शेलार यांनी केला आहे. रोजगार पळवण्यासाठी, महाराष्ट्रात हिंसाचार करण्यासाठी आणि बांगलादेशींविरुद्धच्या कारवाया रोखण्यासाठी यांच्या गुप्त बैठका सुरू असल्याचा आरोप आशिष शेलार यांनी केला आहे. महाराष्ट्रातील मुलांना तुम्ही वडापावच्या गाड्या देणार आणि इकडचे उद्योग पश्चिम बंगालमध्ये नेणार यावर सरकारने भूमिका स्पष्ट करावी, असे शेलार यांनी म्हटले आहे.

जय हिंदू राष्ट्र आम्हाला मान्य आहे, हे ममता यांना मान्य आहे का आणि त्यांना मान्य नसेल तर त्यावर शिवसेनेची भूमिका काय असणार आहे त्यावर शिवसेनेने स्पष्ट करावे. ममता यांच्या बैठकीसोबत महाराष्ट्राला काय मिळाले हे सरकारने सांगावे. निवडणुकीत भाजप विरोधात यायचं असेल तर त्याचे उत्तर शून्य अधिका शून्य बरोबर शून्य असेच असणार आहे, असे आशिष शेलार म्हणाले.

Exit mobile version