‘टिपू उद्यानावरून शिवसेनेची लाचारी कळली!’

‘टिपू उद्यानावरून शिवसेनेची लाचारी कळली!’

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेते आमनेसामने आले आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधान सभा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर आता  भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

शिवसेनेसोबतच्या युवतीबाबत बोलताना ते म्हणाले, की आमची बाळासाहेब यांच्याबरोबर असणारी युती ही वैचारीक युती होती. बाळासाहेब यांच्यासोबत असणाऱ्या युतीचा आम्हाला अभिमानाच आहे, असे आशिष शेलार म्हणाले. ३७० कलमाच्या वेळी उद्धव ठाकरे तुम्ही कुठे होता? असा सवाल त्यांनी केला.

याकूब मेननच्या फाशीला विरोध करणारा मंत्री तुमच्या मंत्रीमंडळात का आहे? असा सवालही त्यांनी विचारला आहे. मुंबईतील मैदानाला टिपू सुलतानाचे नाव दिल्यावरूनही त्यांनी शिवसेनेवर टीकेची तोफ डागली आहे. सत्तेसाठी लाचारी काय असते हे शिवसेनेकडे पाहून कळते, असा टोला आशिष शेलार यांनी लगावला आहे. महाराष्ट्रातल्या सत्तेसाठी तू जास्त लाचार की मी जास्त लाचार अशी स्पर्धा काँग्रेस आणि सेनेत सुरू असल्याचे त्यांनी म्हटले.

हे ही वाचा:

देशविरोधी भाषण करणाऱ्या शर्जिल इमामविरोधात देशद्रोहाच्या खटल्याचे आदेश

वनडे मालिका विजयानंतर दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू म्हणतो जय श्री राम

वर्ध्यात भीषण अपघात; आमदाराच्या मुलासह ६ विद्यार्थी ठार

राज्यातील ८९ टक्के नमुने हे ओमायक्रोन बाधित; आठव्या चाचणीचे निष्कर्ष

टिपू सुलतान याच्या नावावरून आमदार अतुल भातखळकर आणि राम कदम यांनीही शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. ठाकरे सरकारच्या राज्यात मुघल कबरीतून पुन्हा अवतरलेत, असा टोला अतुल भातखळकर यांनी लगावला होता. हेच का शिवसेनेचं हिंदुत्व असा सवाल राम कदम यांनी विचारला आहे.

Exit mobile version