भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार आशिष शेलार यांनी शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. संजय राऊत ज्याला सत्य म्हणतात ती केवळ कोल्हेकुई आहे असे म्हणत त्यांनी संजय राऊत यांच्यावर घणाघात केला आहे. नरिमन पॉइंट येथील भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
२०१४ ते २०२१ संजय राऊत हे सातत्याने भारतीय जनता पार्टी विरोधात केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार विरोधात भाजपाच्या शीर्षस्थ नेतृत्वा विरोधात बोलत होते, लिहीत होते, टीका करत होते, सात वर्षे रोज विपर्यास करत होते, भाजपाला बदनाम करत होते. पण सात वर्ष त्यांच्यामागे ईडी लागली नाही असा हल्लाबोल आशिष शेलार यांनी केला आहे.
त्यामुळे संजय राऊत करतात ती केवळ कोल्हेकुई आहे ते सत्य नाही. आज जेव्हा तुमची भ्रष्टाचाराची सर्व प्रकरणे बाहेर येऊ लागलेत किंवा येण्याच्या मार्गावर आहेत तेव्हा तुमची होत असलेली ही आदळआपट आणि थयथयाट आहे.
आज अशी परिस्थिती आहे की ज्या संजय राऊत यांनी महाविकास आघाडी सरकारच्या जन्मासाठी आगपाखड केली ते आज एकाकी पडले आहेत. त्यांच्या समर्थनार्थ कोणी यायला तयार नाही. शिवसेनेचा कोणी नेता त्यांच्यासाठी बोलायला तयार नाही. ज्या राष्ट्रवादीच्या गोदीमध्ये जाऊन ते बसतात त्या राष्ट्रवादी पक्षाचे सर्वोच्च नेते किंवा इतर कोणी नेते जाहीररित्या त्यांची बाजू मांडायला तयार नाहीत.
हे ही वाचा:
डॉक्टर घेणार हिप्पोक्रॅटिक ओथ ऐवजी चरक शपथ?
‘काँग्रेसची हुजुरी करण्यासाठी संजय राऊत वाटेल ते बोलू शकतात’
पत्रकार राणा अय्यूब यांची १.७७ कोटी रक्कम ईडीने गोठवली
खबरदार ! रेल्वेच्या दिव्यांग डब्यातून प्रवास कराल तर…
त्यामुळे त्यांना तीन वेळा लिहावे लागले की सत्तेत असलेले काय करतात ते बोला? मंत्रिपदावर असलेल्यांनी बोलले पाहिजे. मुंबई पोलिस काही करत नाहीत. त्यामुळे दुर्दैवाने ते एकटे पडल्येत आणि मला त्यांची काळजी वाटू लागले असे आशिष शेलार यांनी म्हटले आहे.