24 C
Mumbai
Thursday, December 26, 2024
घरराजकारणमराठी माणसाच्या घरांचे कट-कमिशन खाऊन डॉक्टरेट मिळत नाही!

मराठी माणसाच्या घरांचे कट-कमिशन खाऊन डॉक्टरेट मिळत नाही!

आशिष शेलारांचा संजय राऊतांना टोला

Google News Follow

Related

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नुकतीच जपानच्या कोयासन विद्यापीठाकडून मानद डॉक्टेरेट पदवी देण्यात आली. यानंतर ठाकरे गटाकडून मुख्यमंत्री एकानाथ शिंदे आणि उपमुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करण्यात आली आहे. ‘सामना’मधील आग्रलेखात शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर डॉक्टरेट पदवीचा संदर्भ देत टीका करण्यात आली आहे. त्यावर भाजपाचे नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी जोरदार निशाणा साधला आहे.

महाराष्ट्रात शेतकरी, बेरोजगार रोज आत्महत्या करत आहेत आणि बहुदा या महान कामगिरीबद्दलच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘डॉक्टरेट’ उपाधी देऊन सन्मानित करण्यात येत आहे, अशी टीका त्यांनी केली आहे. आशिष शेलार यांनी नावापुढे ‘डॉ’ लागण्यासाठी फक्त अग्रलेख लिहून भागत नाही अशा खोचक शब्दात संजय राऊतांना सुनावलं आहे.

आशिष शेलार म्हणाले की, “रोज सकाळी टिव्हीवर फालतू बडबड करुन अथवा मराठी माणसाच्या घरांचे कटकमिशन खाऊन डॉक्टरेट मिळत नाही. नतद्रष्टासारखे “हग्रलेख” लिहून तर नाहीच नाही. नावापुढे “डॉ” लागण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री डॉ. देवेंद्र फडणवीस यांच्यासारखी गरीबांची सेवा, प्रचंड मेहनत, कष्ट, धाडस, धडाडी, निष्ठा, त्याग आणि संघर्ष करावा लागतो…! “डॉक्टर” या साडेतीन अक्षरांची किंमत तुम्ही नाही समजू शकणार श्रीमान संजयबाबू!” अशा खोचक शब्दात आशिष शेलारांनी संजय राऊतांना खडेबोल सुनावले आहेत.

हे ही वाचा:

सीएएची अंमलबजावणी करण्यापासून कोणी रोखू शकत नाही!

शेख हसिनांकडून मुस्लिमांचे लांगुलचालन!

केएल राहुलने भारताचा खेळ सावरला!

बीसीसीआयचा निर्णय; आयपीएल स्पॉन्सरशिपमध्ये चीनसाठी दरवाजे बंद

“राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांनी सह्याद्रीच्या कड्या-कपाऱ्याही अश्रूंनी भिजल्या आहेत. पश्चिम विदर्भात वर्षभरात सव्वा हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, असे निर्घृण राज्य करणारे लोक श्रीराम मंदिर सोहळ्याच्या राजकीय घंटानाद करीत फिरत आहेत. महाराष्ट्रात शेतकरी, बेरोजगार रोज आत्महत्या करत आहेत आणि बहुदा या महान कामगिरीबद्दलच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘डॉक्टरेट’ उपाधी देऊन सन्मानित करण्यात येत आहे. आता देवेंद्र फडणवीस यांच्यामागे ‘डॉ.’ अशी उपाधी लागेल. मुख्यमंत्री शिंदे यांनाही मधल्या काळात कुणा संस्थेने सामाजिक कार्याबद्दल ‘डॉ.’ पदवी दिली. पण विद्यमान सरकारच्या काळात महाराष्ट्रात तीन हजारांवर शेतकऱ्यांच्या नावापुढे ‘कै.’, ‘स्व.’ अशा उपाध्या लागल्या. त्यांची घरेदारे उजाड झाली. कुटुंबे अनाथ व पोरकी झाली. त्यावर सरकारमधले ‘डॉ.’ बोलत नाहीत,” असे अग्रलेखात लिहिले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा