‘अंगावर आलात तर शिंगावर घेऊ’

‘अंगावर आलात तर शिंगावर घेऊ’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर बोलताना महाराष्ट्राचा अपमान केल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे. तसेच यावरून अनेक नेत्यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर टीकाही केली. त्यावरून आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राची माफी मागावी अन्यथा उद्या राज्यभरात भाजपच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करण्याचा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे. नाना पटोले यांनी दिलेल्या आंदोलनाच्या इशाऱ्याला आता भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

‘काँग्रेसने आंदोलनाचा प्रयत्न जरुर करावा. लोकशाहीत आंदोलन करण्याचा अधिकार सर्वांना आहे. पण नाना पटोले तुम्ही पहिल्यांदा उत्तर द्या की, त्या गरीब, श्रमिक, मजदूर माणसाला तुम्ही का फसवले? तुम्ही सुपरस्प्रेडर म्हणून काम का केलत? त्यांना घराबाहेर आणून तुम्ही असुरक्षित का केलत? तुम्ही महाराष्ट्रातील श्रमिक, मजदूर माणसाचा अपमान का केलात? कोरोना काळात त्यांची माथी का फिरवलीत? आणि चिनी हस्तक म्हणून चीनला हवं होतं ते तुम्ही का केलं? असे अनेक प्रश्न आशिष शेलार यांनी उपस्थित केले आहेत. अंगावर आलात तर शिंगावर घेऊ, असा इशाराही आशिष शेलार यांनी नाना पटोले यांना दिला आहे.

हे ही वाचा:

कर्नाटकात जय श्री राम विरुद्ध अल्ला हू अकबर वाद पेटला

‘काँग्रेसचे नाव बदलून माय-लेकाची काँग्रेस असे करा’

काँग्रेस नसती तर…पंतप्रधानांनी काढले काँग्रेसचे वाभाडे!

गौतम अदानी बनले आशियाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल लोकसभेत आणि आज राज्यसभेत बोलताना काँग्रेसवर घाणाघाती टीका केली आहे. महाराष्ट्र काँग्रेसमुळे देशभर कोरोनाचा फैलाव झाल्याचा आरोप पंतप्रधान मोदी यांनी केला आहे. त्यावरून राज्यातील राजकारणात आरोप प्रत्यारोपांना जोर आला आहे. आजही नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर घाणाघाती टीका केली.

Exit mobile version