‘नेत्यांच्या गाडीवर चप्पलफेक करणाऱ्यांवर कोणता गुन्हा दाखल करणार आहात?’

‘नेत्यांच्या गाडीवर चप्पलफेक करणाऱ्यांवर कोणता गुन्हा दाखल करणार आहात?’

पिंपरी चिंचवडमध्ये रविवार, ६ मार्च रोजी विकासकामांच्या उद्घाटनासाठी आलेल्या माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच्या गाडीवर चप्पल भिरकावण्यात आल्यानंतर परिस्थिती तणावपूर्ण झाली होती. यावरून भाजपा नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.

राज्यात अराजकता पसरत चालली आहे, अशी घाणाघाती टीका भाजप नेते आशिष शेलार यांनी केली आहे. केंद्रीय मंत्र्यांना चौकशीसाठी नऊ- दहा तास बसवून ठेवलं जातंय, आमदारांना अटकपूर्व जामिनाचं प्रोटेक्शन असतानाही डांबून ठेवलं जातंय, तक्रारदार म्हणून पोलिसांकडे जाणाऱ्या किरीट सोमय्या, करुणा शर्मा यांच्यावरच केस दाखल केली जात आहे, विविध केसमधील पंचांवर मंत्रीच दोषारोप करत आहेत, असे अनेक प्रश्न आशिष शेलार यांनी उपस्थित केले आहेत. अमरावतीत शाईफेक केल्याबद्दल गुन्हा दाखल केलात, मग विरोधीपक्ष नेत्यांच्या गाडीवर चप्पलफेक करणाऱ्यांवर कोणता गुन्हा दाखल करणार आहात? असा संतप्त सवाल आशिष शेलार यांनी विचारला आहे.

हे ही वाचा:

को-लोकेशन घोटाळ्याप्रकरणी एनएसईच्या चित्रा रामकृष्ण यांना अटक

मुंबईत गाड्या ‘टो’ न करण्याचा प्रयोग

भारतीय महिलांनी पाकिस्तानला नमवून केली वर्ल्डकपची दमदार सुरुवात

झेलेन्स्की हिटलिस्टवर

या घटनेनंतर देवेंद्र फडणवीस यांनीही राष्ट्रवादीवर टीका केली. “स्वत: काही करायचं नाही. आपल्या कार्यकाळात ते काहीच करु शकले नाहीत आणि आमच्या नगरसेवकांनी, महापौर, पदाधिकाऱ्यांनी एवढं चांगलं काम करुन दाखवलं याबद्दल त्यांच्या मनात असुया आहे,” अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.

Exit mobile version