मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्षांची टगेगिरी सुरू आहे

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्षांची टगेगिरी सुरू आहे

भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार आशिष शेलार यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून ठाकरे सरकारवर तोफ डागली आहे. मराठा आरक्षण असो, ओबीसींचे राजकीय आरक्षण, तसेच शेतकरी, बारा बलुतेदारांच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रातील तीन सत्ताधारी पक्षांची टगेगिरी सुरू आहे असा घणाघात शेलार यांनी केला. सरकारला मराठा आरक्षण द्यायचेच नाही असा गंभीर आरोपही आशिष शेलार यांनी यावेळी केला आहे.

भाजपा नेते आमदार आशिष शेलार हे सध्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. या दौर्‍याच्या निमित्ताने शनिवारी ते पुणे येथे होते. तर रविवारी सातारा आणि कराड भागात भारतीय जनता पार्टीच्या आमदारांच्या भेटी तसेच संघटनात्मक बैठका त्यांनी घेतल्या. रविवार, ११ जुलै रोजी कराड येथे पत्रकार परिषदेत त्यांनी महाराष्ट्रातील ठाकरे सरकारवर टिकास्त्र डागले आहे.

हे ही वाचा:

१५ ऑगस्ट पूर्वी उत्तर प्रदेशात करायचे होते बॉम्बस्फोट

ईडी करणार सचिन वाझेवर प्रश्नांचा मारा!

उत्तर प्रदेश एटीएसने उधळला अल कायदाचा कट…दोन दहशतवादी अटकेत

दहशतवाद्यांना मदत कराल तर याद राखा!

या वेळी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून अशिष शेलार ठाकरे सरकारवर चांगलेच बरसले मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर खूप चर्चा झाली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांनी सरकार आणि माध्यमांमध्ये मराठा आरक्षणावर सविस्तरपणे भूमिका मांडली आहे. देशातील राज्यांना स्वतःच्या अधिकारात आरक्षण देण्यापासून सर्वोच्च न्यायालयाने कोणत्याही प्रकारचा मज्जाव केलेला नाही. पण आरक्षणाचा कायदा टिकाऊ करण्यासाठी राज्यात मागासवर्ग आयोगाची निर्मिती करणे आवश्यक आहे. या आयोगाच्या माध्यमातून ऐतिहासिक, सांख्यिकी आणि इम्पिरिकल डेटा जमा केला पाहिजे आणि त्या आधारेच सरकारने मराठा आरक्षणाचा कायदा मंजूर करावा असे शेलार यांनी सांगितले.

तर आधी हा कायदा कॅबिनेटमध्ये मंजूर करून नंतर तो सभागृहात मंजूर करून घ्यावा. त्या नंतर हे विधेयक राष्ट्रपतींकडे दिल्यावर सूचीमध्ये बदल करण्याचा अधिकार केंद्र सरकारला आहे असे शेलार म्हणाले. आरक्षणाबाबत ही एक प्रक्रिया आहे. पण ठाकरे सरकार शेवटचे पाऊल आधी सांगते. पायाभरणी न करताच इमारत उभी राहिली असे आभासी चित्र निर्माण करण्याचे पाप सरकार मार्फत केले जात आहे आणि हे जाणून बुजून केले जात आहे असे अशिष शेलार म्हणाले. तर सरकारला मराठ्यांना आरक्षण द्यायचेच नाही असा गंभीर आरोपही शेलार यांनी केला आहे.

Exit mobile version