महाराष्ट्रात सापडलेल्या तलवारीच्या साठ्यासाठी गृहमंत्र्यांवरच गुन्हा दाखल करावा का ?

महाराष्ट्रात सापडलेल्या तलवारीच्या साठ्यासाठी गृहमंत्र्यांवरच गुन्हा दाखल करावा का ?

महाराष्ट्रात सध्या तलवारीचा मोठा साठा सापडल्यामुळे खळबळ उडाली आहे. धुळ्यात हा तलवारीचा मोठा साठा सापडला असून यावरून आता राज्यातील राजकारण तापताना दिसत आहे. भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार आशिष शेलार यांनी या विषयात ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. राज्यात सापडलेल्या तलवारीच्या साठ्या संदर्भात गृहमंत्र्यांवरच गुन्हा दाखल करायचा का? असा सवाल शेलार यांनी केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात सभांमध्ये तलवार दाखवल्या प्रकरणी गुन्हा दाखल झालेले पाहायला मिळाले. याचाच आधार घेत आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारवर तोफ डागली आहे. मोहित भारतीय यांनी कार्यक्रमात एक तलवार दाखवली तर गुन्हा दाखल होतो. मग आता राज्यात एवढा तलवारीचा साठा सापडत आहे. तर आता राज्याच्या गृहमंत्र्यांवरच गुन्हा दाखल करावा का? असे शेलार यांनी विचारले आहे.

हे ही वाचा:

‘राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या नावाने हजारो महिलांची फसवणूक’

आसाममध्ये पंतप्रधान मोदींनी सात कॅन्सर रुग्णालये केली समर्पित

केरळच्या कम्युनिस्ट सरकारलाही पडली मोदींच्या गुजरातची भुरळ

नेताजींच्या संदेशासाठी दहा वर्षांच्या मुलाची सायकल सफर

धुळ्यातील सोनगीर पोलिसांनी ही कारवाई केली असून एका वाहनासह ८९ तलवारी व खंजीर जप्त केला आहे. या तलवारी नेमक्या कशासाठी नेल्या जात होत्या, त्यामागे कोण आहे, याचा तपास केला जात आहे. पोलिसांनी जालना येथून चार जणांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी मोहम्मद शरीफ, मोहम्मद शफिक, शेख इलियाज शेख, सय्यद नईम, सय्यद रहीम, कपिल दाभाडे यांना अटक करण्यात आली आहे. सोनगीर पोलिस ठाण्यात यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version