भारताचे गृहमंत्री अमित शहा हे ५ सप्टेंबरला मुंबई दौऱ्यावर येणार असून त्यासंदर्भात वेगवेगळ्या बातम्या माध्यमातून चर्चिल्या जात आहेत. त्यावरून मुंबई भाजपाचे अध्यक्ष ऍड. आशीष शेलार यांनी ट्विट करत अशा बातम्या दुर्दैवी आणि खोडसाळ असल्याचे म्हटले आहे.
अमित शहा हे मुंबई भेटीवर असताना राज ठाकरे यांची भेट घेतील, भाजपा आणि मनसे यांच्यातील युतीची चर्चा होईल वगैरे बातम्या प्रसिद्ध करण्यात येत आहेत. मात्र अशा बातम्यांमागे तथ्य आहे अथवा नाही, याची कोणतीही खातरजमा न करताच अशा बातम्या दिल्या जात असल्याचे शेलार यांचे म्हणणे आहे. त्यांनी ट्विट करताना म्हटले आहे की, देशाचे गृहमंत्री अमितभाई शहा यांच्या मुंबई दौऱ्याच्या घोषित कार्यक्रमाव्यतिरिक्त अन्य राजकीय भेटीगाठींबाबत कपोलकल्पित, उलटसुलट बातम्या चालविण्याचा खोडसाळपणा स्वखुशीने माध्यमांमध्ये सुरू आहे. तो फार हास्यास्पद आहे. अमितभाईंच्या मुंबई दौऱ्यात नेहमीच अशा टेबलस्टोरींना उत येतो. हे दुर्दैवी आहे.
हे ही वाचा:
केजरीवाल विसरले ती लिकर पॉलिसी
नवे नौदल चिन्ह, मोदी आणि पिवळे इतिहासकार
‘एनआयए’ने दाऊद इब्राहिमची लायकीच काढली
‘राज साहेब आपल्या परखड वक्तृत्वाची महाराष्ट्र वाट पाहतोय’
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) September 2, 2022
सध्या विविध राजकीय नेते गणेशोत्सवाच्या निमित्त वेगवेगळ्या राजकीय व्यक्तींच्या भेटी घेत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. तर फडणवीस आणि काँग्रेसचे अशोक चव्हाण हे गणपतीसाठी एकाच ठिकाणी आल्यामुळे त्यांच्यात काही राजकीय चर्चा झाल्याचे बोलले जाऊ लागले. एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या घरी जाऊन तिथेही गणपतीचे दर्शन घेतले. त्यावरूनही चर्चा रंगली. अशाच प्रकारची चर्चा अमित शहा मुंबई भेटीवर आले तर काय काय होईल, यावरून सुरू झाली आहे. मात्र त्याला कोणताही आधार नाही.