आव्हाड यांचा राजीनामा म्हणजे चर्चगेटची गाडी पकडून मुलुंडला उतरायचे आहे असे म्हणण्यासारखे!

पोलिसांनी दाखल केलेले गुन्हे आणि आमदारकीचा राजीनामा याचा संबंध काय? असा सवाल शेलारांनी केला आहे.

आव्हाड यांचा राजीनामा म्हणजे चर्चगेटची गाडी पकडून मुलुंडला उतरायचे आहे असे म्हणण्यासारखे!

राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात भाजपाच्या महिला पदाधिकाऱ्याने विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. यानंतर आव्हाडांनी ट्विट करत मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतोय, असं म्हटलं. आव्हाडांच्या या निर्णयावर भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी प्रश्न उपस्थित करत त्यांच्यावर टीकास्त्र डागले आहे. पोलिसांनी दाखल केलेले गुन्हे आणि आमदारकीचा राजीनामा याचा संबंध काय? असा सवाल शेलारांनी केला आहे.

आव्हाड यांचा राजीनामा म्हणजे चर्चगेटची गाडी पकडून मुलुंडला उतरायचे आहे असे म्हणण्यासारखे, असा टोला शेलारांनी लगावला आहे. शेलार म्हणाले, आमदारकीच्या राजीनाम्याशी याचा काहीही संबंध नाही. जर ते निर्दोष आहेत तर त्यांनी त्यांची कायदेशीर बाजू लढावी. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बनवलेल्या संविधानात प्रत्येक निर्दोष व्यक्तीला व्यक्तीला निर्दोषत्व सिद्ध करण्याची मुभा आहे. जेव्हा निर्दोषत्व सिद्ध करता येत नाही तेव्हा असे वेडेचाळे केले जातात, अशी टीका शेलारांनी आव्हाडांवर केली आहे.

पुढे शेलार म्हणाले, जर आमदारकीचा राजीनामा द्यायचा असेल तर द्या, तीही जागा आम्ही जिंकून येतो. आरोप, प्रत्यारोप, जबरदस्ती, विनयभंग, दादागिरी आणि मारहाण करू नये आणि केल्यास त्याला कायदेशीर बडगा आहे. हे गृहमंत्र्यांनी दाखवून दिलंय, गृहमंत्र्यांच्या या निर्णयाचं स्वागत शेलारांनी केलं आहे. चोरी पकडली गेली तर पकडणारा पोलीस जबाबदार असं वक्तव्य आव्हाड आणि राष्ट्रवादी करत आहे.

हे ही वाचा:

आव्हाडांच्या कार्यकर्त्यांचा धुडगूस; सर्वसामान्यांचे हाल

आव्हाडांवर विनयभंगाचा गुन्हा, आव्हाड देणार आमदारकीचा राजीनामा

राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाडांचे ‘अशुद्ध’ ट्विट व्हायरल

टिपू सुलतानाचा पुतळा बसवला तर बाबरी ढाचा सारखी अवस्था करू

दरम्यान, विनयभंगाच्या गुन्ह्यानंतर आव्हाड यांनी ट्विट करत मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतोय, असं म्हटलं. पोलीसांनी माझ्या विरुद्ध ७२ तासात दोन खोटे गुन्हे दाखल केले आणि तोही ३५४. मी ह्या पोलिसी अत्याचाराविरुद्ध लढणार, मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतो आहे, अशा प्रकारचं आव्हाडांनी ट्विट केलं आहे.

Exit mobile version