गेल्या काही दिवसांपासून राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांचे त्यांच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात म्हणून मुंबईतील आझाद मैदानावर संप सुरू आहे. संपावर अद्यापही तोडगा निघालेला नाही. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते आशिष शेलार यांनी आज (१४ नोव्हेंबर) आझाद मैदानावर जाऊन एसटी कर्मचाऱ्यांची भेट घेतली आणि त्यांच्या आंदोलनात सहभागी झाले. यावेळी त्यांनी आंदोलकांसोबत बसून त्यांनी चर्चा केली आणि नंतर केलेल्या भाषणात त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला.
We will fight! आपल्या मागण्यांसाठी रणरणत्या उणात संघर्ष करणाऱ्या #ST कामगार, कर्मचाऱ्यांना आज आझाद मैदानात जाऊन भेटलो. त्यांच्या लढ्याला पाठींबा दिला व संवाद साधला. यावेळी शेतकरी नेते @Sadabhau_khot आणि अन्य पदाधिकारी ही उपस्थित होते! @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis @ChDadaPatil pic.twitter.com/kvThpF22MC
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) November 14, 2021
“दिवस- रात्र पाहत नाहीत. घरात सुखाचा- दुःखाचा दिवस पाहत नाहीत. नोकरी म्हणजे महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाची सेवा हेच व्रत घेऊन काम करणारे तुम्ही आहात. तुम्हाला सलाम”, असे आशिष शेलारांनी आपल्या भाषणात म्हटले. “आपली मागणी खूप सोपी आहे. शासकीय कर्मचाऱ्याला जशी ओळख आणि काही फायदे असतात तशी शासकीय कर्मचारी म्हणून ओळख द्या आणि तसेच फायदे द्या. त्यासाठी एका वाक्याचा जीआर काढा,” असे आशिष शेलार यांनी भाषणात म्हटले.
“आताचे सरकार हे मायावी सरकार आहे. मायावी राक्षस जसा असतो तसे हे सरकार मायावी शब्दात सामान्य माणसाला भूलावायचे काम करत असते. याच सरकारच्या प्रमुखाने सांगितले होते की, आम्ही गावागावात बांधावर जाऊन शेतकऱ्याला कर्जमुक्त करू असे सांगितले होते. मात्र, तसे काहीही झालेले नाही. तसेच मायावी शब्दात तुम्हाला फसवायला बघतील. मायावी यासाठी कारण हे बसतात दुसऱ्याबरोबर आणि सरकार बनवतात तिसऱ्याबरोबर,” असा खोचक टोलाही आशिष शेलारांनी सरकारला लगावला.
हे ही वाचा:
श्वानाची सजगता आणि पकडले गेले ९० कोटींचे ड्रग्स
तुमच्याकडून लाच तर घेतली गेली नाही ना, पंतप्रधानांनी विचारला प्रश्न…काय आहे प्रकरण?
मिलिंद तेलतुंबडे यमसदनी! गृहमंत्र्यांनी केले शिक्कामोर्तब
त्रिपुरात कोणत्याही मशीदिची तोडफोड, नुकसान झालेच नाही
एसटी महामंडळाचे शासनात विलिनीकरण व्हावे ही प्रमुख मागणी पूर्ण होईपर्यंत संप मागे घेतला जाणार नाही यावर कर्मचारी ठाम असून दुसरीकडे यावर काहीही तोडगा निघत नसताना राज्य सरकारने कठोर भूमिका घेत कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई सुरू केली आहे.