महाराष्ट्रातील विविध भरती परीक्षांचे पेपर फुटीचे प्रमाण वाढले असून याबाबत भाजप आमदार आशिष शेलार यांनी सरकारला धारेवर धरले आहे. पोलीस भरती परीक्षा, आरोग्य विभागाच्या परीक्षांचे पेपर फुटीचे प्रमाण वाढत आहे यावर हे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचे दुर्दैव आहे, असे आशिष शेलार यांनी ‘एबीपी माझा’शी बोलताना म्हटले आहे.
मेहनत घेऊन अभ्यास करायचा आणि मग परीक्षा देऊन नोकरी निमित्त बाहेर पडायचे तेव्हा मात्र या महाविकास आघाडी सरकारच्या ठिसूळ, भ्रष्ट आणि अकार्यक्षम कारभारामुळे युवकांना रोजगार मिळण्याचे मार्ग बंद झाले आहेत आणि हे पाप ठाकरे सरकारचेच आहे. आरोपी पकडले जातात तरीही त्यावर सरकारला आक्षेप असतो हे कोणाच्या राजकीय दबावाखाली सुरू आहे. मिलिटरी इंटेलिजन्सला सुद्धा नाही म्हणायचे आणि पेपरफुटी करणाऱ्या टोळीला पाठीशी घालायचे, कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र, असा सवाल शेलार यांनी विचारला आहे.
हे ही वाचा:
ट्विटरने नियम बदलले; नवाब मलिक आता शेअर करू शकतील का फोटो?
युक्रेनमध्ये नेटो ही धोक्याची घंटा
चन्नी-सिद्धू वादात आता चन्नी आक्रमक भूमिकेत
आसाम, पश्चिम बंगालमधील लोकसंख्येचे बदल ही चिंतेची बाब
राज्यातील युवा स्वकष्टाने प्रामाणिकपणे मेहनत करून शिक्षण घेतात आणि नोकरीसाठी जाताना त्यांना पेपरफुटीला सामोरे जावे लागते, ही पिळवणूक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या परीक्षा पुन्हा घेण्यात याव्यात. हे प्रकरण मोठे असून या सर्व प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्यात यावा असे आशिष शेलार यांनी म्हटले आहे.
कोरोना काळात अर्थचक्राला गती देण्याचे काम शेतकऱ्यांनी केले आहे. त्याचीच वीज कनेक्शन कापायचे काम सरकार करत आहे. मुख्यमंत्र्यांची प्रकृती बरी व्हावी अशी सदिच्छा आहेच पण त्यापूर्वीही मुख्यमंत्री मंत्रालयात जात नव्हते, असा टोला आशिष शेलार यांनी लगावला आहे. निर्णय घेण्याची जबाबदारी कोणाला दिलेली नाही. प्रश्न अनुत्तरीत आहेत, त्यामुळेही जनतेवर अन्याय होत आहे.