महाविकास आघाडी सरकारला आज दोन वर्षे पूर्ण झाली असून विरोधी पक्ष नेत्यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी ही आज माध्यमांशी बोलताना ठाकरे सरकारवर टीका केली. सरकारला सामान्य जनतेशी काहीही देणघेण नसल्याचे आशिष शेलार यांनी म्हटले आहे.
आशिष शेलार म्हणाले की, काही वर्षांपूर्वी ‘तीन पैशाचा तमाशा’ हे प्रसिद्ध नाटक आले होते. अशीच आज महाराष्ट्राची परिस्थिती आहे. सत्तेचा उपभोग घ्यायचा आणि त्यातून संपत्ती निर्माण करायची हेच सुरू असल्याचे आशिष शेलार यांनी म्हटले आहे. हे सरकार जनता केंद्रीत होण्यापेक्षा पुत्र, पुत्री आणि पुतण्या यांच्या भोवती फिरणारे आहे, असा टोला आशिष शेलारांनी ठाकरे सरकारला लगावला आहे.
हे ही वाचा:
‘ठाकरे सरकारचा कारभार, महाराष्ट्र बेजार’
कल्याणमध्ये विनापरवाना बालगृहात कोंडलेल्या मुलांची सुटका
‘बाबासाहेब पुरंदरे हे इतिहासाचे एनसायक्लोपिडीयाच होते’
नागपूरमधून ८४ लाखांची रोकड जप्त
राज्याची बदनामी ही यांचे पुत्र प्रेम आणि पब, पेग, पार्टी आणि पेंग्विन यामुळे झाली आहे. मंदिरासाठी जनता आंदोलन करत असते आणि सरकारची भूमिका मदिरालय सुरु करण्याची असते. या गोष्टींना आमचा विरोध नसून प्राधान्यक्रमाला आहे, असेही आशिष शेलार म्हणाले. सरकारमधील मंत्र्यांच्या घोटाळ्यांवरही त्यांनी भाष्य केले.
आजचा दिवस खऱ्या अर्थाने वेदनांच्या प्रकटीकरणाचा दिवस आहे. असंख्य वेदना जनतेला भोगाव्या लागत असून सरकारला त्याचे काहीही देणेघेणे नाही, असा टोला आशिष शेलार यांनी महाविकास आघाडी सरकारला लगावला आहे.