वरळी येथे नुकत्याच झालेल्या सिलेंडर स्फोटाच्या घटनेवरून अशिष शेलार यांनी ठाकरे सरकार आणि मुंबई महापालिकेवर हल्लाबोल केला होता. यावेळी आशिष शेलार यांनी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या संदर्भात आक्षेपार्ह विधान केल्याचा दावा महिला आयोगाकडून करण्यात आला आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी यासंदर्भात चौकशीचे आदेश मुंबई पोलिसांना दिले आहेत.
भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारच्या मुस्कटदाबी विरोधात आवाज उठवला आहे. ‘ठाकरे सरकारच्या अहंकारासमोर झुकणार नाही’ असे म्हणत सरकारचा नाकर्तेपणा विरुद्धचा संघर्ष अजून कडवा करण्याचा निर्धार त्यांनी बोलून दाखवला आहे.
तर महिला आयोगाने केलेले हे दावे संपूर्णतः खोटे असल्याचे शेलार यांनी सांगितले आहे. आपण जे बोललोच नाही त्या आधारे आपल्या विरोधात खोट्या केसेस टाकण्याचे काम ठाकरे सरकारच्या माध्यमातून सुरू असल्याचे शेलार यांनी म्हटले आहे. या संदर्भात त्यांनी महाराष्ट्र पोलीस आयुक्तांना पत्र पाठवून आपली बाजू मांडली आहे. तर समाज माध्यमांवर एक व्हिडिओ पोस्ट करत ठाकरे सरकारवर हल्ला चढवला आहे.
हे ही वाचा:
बिपीन रावत यांना फेटा बांधता येत होता… संभाजीराजेंनी सांगितल्या आठवणी
३७० हटवल्यावर काश्मीरमधून हिंदू पळाले का? किती अतिरेकी मारले गेले?
भारतीय संघाची धुरा रोहित शर्माच्या खांद्यावर
राष्ट्रपती, पंतप्रधानांनी वाहिली बिपीन रावत यांना श्रद्धांजली
“पोलिसांचा आणि सत्तेचा गैरवापर करून माझ्याविरोधात खोट्या केसेस उभ्या केल्या असतील, पण सत्य समोर येईलच. माझा सवाल आजही तोच आहे. नायर रुग्णालयातील छोटे बालक मृत्युमुखी का पडले? त्याचे वडील मृत्युमुखी का पडले? त्याच्या मातेचा दुर्दैवी मृत्यू का झाला? नायर रुग्णालयात रुग्णांना योग्य वेळी सोयीसुविधा का नाही मिळाली?
या प्रश्नांची उत्तरे देता येत नाहीत म्हणून जे मी बोललोच नाही ते निर्माण करून खोट्या केसेस टाकल्या जात आहेत. जे मी बोललो ते फेसबुकच्या माध्यमातून आजही जनतेसमोर आहे. त्यामुळे जे मी बोललोच नाही त्यावरून तुम्ही खोट्या केसेस केल्या आहेत. पण माझा आवाज तुम्ही दाबू शकत नाही. कोस्टल रोडचा भ्रष्टाचार समोर आणला म्हणून खोट्या केसेस केल्यात का, जनतेला न्याय द्या हे म्हटले म्हणून खोट्या केसेस करताय का, ओबीसी आरक्षण टिकायला हवे हे बोलतोय म्हणून खोट्या केसेस करताय का, सावरकरांचा कोणीही अपमान करून नये यासाठी प्रश्न विचारले म्हणून नोटीस करताय का, असे सवाल त्यांनी विचारले आहेत.सरकारच्या नाकर्तेपणा विरुद्धचा संघर्ष मी अजून कडवा करेन” असे शेलार यांनी म्हटले आहे.