‘पाकिस्तानी एजन्टसाठी बेस्ट बसेस भंगारात काढल्यात का?’

‘पाकिस्तानी एजन्टसाठी बेस्ट बसेस भंगारात काढल्यात का?’

पाच वर्षांपूर्वी ९० कोटी खर्च करून ‘बेस्ट’ने १८५ डिझेल बस खरेदी केल्या होत्या. या बसेस चांगल्या स्थितीत असून आणखी १० वर्षे या बसचे आयुष्य आहे. मात्र, याच बस आता ‘बेस्ट’ने विकायला काढल्या आहेत. यावरून भाजपा नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी ‘बेस्ट’वर निशाणा साधला आहे.

आशिष शेलार यांनी ट्विट करत ‘बेस्ट’च्या कारभारावर ताशेरे ओढले आहेत. “पाच वर्षांपूर्वी घेतलेल्या १८५ गाड्या बेस्टने भंगारात का काढल्यात?” असा संतप्त सवाल त्यांनी विचरला आहे. “बेस्टमध्ये बसचा तुटवडा निर्माण करायचाय? २ हजार ८०० कोटींचं टेंडर ज्याला दिलंय त्या पाकिस्तानी एजन्ट तुमूलुरीच्या कंपनीच्या ई- बसची गरज निर्माण करायची आहे का?” असे प्रश्न आशिष शेलार यांनी उपस्थित केले आहेत. सारे काही त्या आंतरराष्ट्रीय घोटाळेबाजासाठी? ये ना चोलबे! अशी टीका आशिष शेलार यांनी केली आहे.

‘बेस्ट’ने २०१७ मध्ये ९० कोटी रुपयांमध्ये १८५ डिझेल बस खरेदी केल्या होत्या. अजूनही पुढचे १० वर्ष या बसेसल आयुष्य आहे. तरीही ‘बेस्ट’ने या बसेस लिलावात काढल्या आहेत. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लिलाव पार पडणार आहे.

हे ही वाचा:

कच्चे तेल, पक्का इरादा

‘ज्या मलिकांनी शिवसेना भवनात स्फोट घडवला त्यांनाच शिवसेना वाचवतेय’

डॉ. नरेंद्र दाभोलकरांची हत्या करणाऱ्यांना साक्षीदारांनी ओळखलं

‘२४ महिन्यात ३६ इमारतींची खरेदी यशवंत जाधव आणि यामिनी जाधव यांनी केली’

“बसेसला बोली चांगली लागली तर लिलावाचे पैसे अधिक इलेक्ट्रिक बसेस खरेदी करण्यासाठी वापरणार असून २०२३ पर्यंत बेस्टच्या ताफ्याला ५० टक्के इलेक्ट्रिक आणि २०२७ पर्यंत १०० टक्के इलेक्ट्रिक बनवायचे आहे,” अशी माहिती ‘बेस्ट’चे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी दिली.

Exit mobile version