वरळीच्या जांबोरी मैदानात दहीहंडीचे आयोजन केल्यामुळे तेथील मैदानाचे नुकसान झाल्याचा आरोप होत असताना मुंबई भाजपा अध्यक्ष आशीष शेलार यांनी दादरच्या शिवाजी पार्क मैदानाच्या अवस्थेवरून मुंबई महानगरपालिकेतील सत्ताधारी शिवसेनेवर शरसंधान केले आहे.
ट्विटच्या माध्यमातून शिवाजी पार्कच्या अवस्थेवर तिखट शब्दांत सवाल उपस्थित करण्यात आला आहे. शिवाजी पार्क मैदानातील माती ढिगारे कुणी खाल्ले असा सवाल विचारण्यात आला आहे.
शिवाजी पार्क मधील कोट्यावधीचे मातीचे थर कुणी खाल्ले? शिवाजी पार्क मध्ये पाणी कुठे मुरतेय? @AUThackeray आधी याचे उत्तर द्या! (1/2) pic.twitter.com/mkErFR0SaF
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) August 22, 2022
या ट्विटमध्ये व्हीडिओच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. त्यात म्हटले आहे की, जांबोरी मैदानात दहीहंडी केल्यामुळे अडीच कोटींचे नुकसान झाल्याचे रडगाणे सुरू आहे. हाच नियम शिवाजी पार्कला का लावत नाही? धुळीचे प्रदूषण कमी करण्यासाठी काय केले. भीक नको पण कुत्रा आवर अशी स्थिती झाली. विकासाचे मॉडेल अंगावर आले आहे. ही ३० सेमीची पट्टी आहे. तुमच्या टेंडरप्रमाणे ३० सेमी माती टाकलेली आहे. पण शिवाजी पार्कमध्ये उरली आहे अवघी ३ सेमी माती. म्हणजे २७ सेमी इतका थर वाहून गेला आहे. २७ एकरमधला २७ सेमीचा थर वाहून गेला आहे. दीड कोटी खर्च केले होते. अडीच कोटी सुशोभीकरणावर खर्च केले. टेडर होते ४ कोटीचे तर पाणी मारण्यासाठी ३ कोटीचे टेंडर. या मैदानातून विकासाचे मॉडेल फेल गेले आहे.
हे ही वाचा:
कोलाड गावकऱ्यांचा घास कुणी चोरला ?
कार्ल्सनविरुद्ध प्रज्ञानंदची विजयाची हॅट्रिक
‘मेटेंची गाडी ओव्हरेटक करताना ड्रायव्हरचं जजमेंट चुकलं आणि अपघात झाला’
शिवसेनेचे माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना सवाल विचारण्यात आला की, पर्यावरण मंत्री असताना का काम केले गेले नाही. प्रदूषण नियंत्रण मंडळाचेही दोनवेळा रिमांइंडर आले पण कारवाई झाली नाही. तिकडे प्याऊचे नियोजन केले आहे. त्याला नळही नाही. हे ४० लाखआंचे काम आहे का. विनाकरण रडणे बंद करा आणि तुम्ही प्रश्नांची उत्तरे द्या.
जांबोरी मैदान येथे भाजपाने दहीहंडीचे आयोजन केले होते. या दहीहंडीनंतर या मैदानाची दुरवस्था झाल्याचे आरोप होत आहेत. मालवाहतुकीची वाहने मैदानात आणल्यामुळे चिखल झाल्याचे म्हटले गेले. वरळीवासियांकडून मैदानाच्या अवस्थेबद्दल टीका होत आहे. पण शिवाजी पार्कमधील मातीचे थर कुठे गेले असा सवाल उपस्थित करत आशीष शेलार यांनी पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेला प्रश्न विचारला आहे.