म्हणे, मुंबईत तासाला ४०० मिमी पाऊस… उबाठाचे विश्वविख्यात प्रवक्ते आबुरावपेक्षा कमी नाहीत

आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना खोचक टोला

म्हणे, मुंबईत तासाला ४०० मिमी पाऊस… उबाठाचे विश्वविख्यात प्रवक्ते आबुरावपेक्षा कमी नाहीत

मुंबईत दोन दिवसांपासून जोरदार पावसाने हजेरी लावली असून मुंबईतील काही भागांत पाणी साचले होते. त्यावरून ठाकरे गटाने सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र डागले होते. यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना आदित्य ठाकरेंनी मुंबईत ४०० मिमी पाऊस झाल्याचे सांगितले. यावरुन भाजपाकडून आदित्य ठाकरे यांच्यावर खोचक टीका करण्यात आली आहे

मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरेंच्या पत्रकार परिषदेची व्हिडीओ क्लिप शेअर करत आदित्य ठाकरेंना सणसणीत टोला लगावला आहे. “तमाशामधील आबुराव आणि बाबुराव एकापेक्षा एक फेकम फाक करुन मनोरंजन करतात. उबाठाचे विश्वविख्यात प्रवक्ते आबुरावपेक्षा कमी नाहीत. काल मातोश्रीच्या युवराजांनी बाबुरावची जागा घेतली.” असा खोचक टोमणा आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरेंना लगावला.

“म्हणे, त्यांच्या कार्यकाळात मुंबईत एका तासाला ४०० मिमी पाऊस झाला, त्याचे यशस्वी व्यवस्थापन त्यांनी केले. मुंबईत एका तासात ४०० मिमी? कधी एवढा पाऊस पडला? युवराज मुंबईची आकडेवारी सांगतात, की चेरापुंजीची? मुंबईत २६ जुलै २००५ ला पण एवढा पाऊस एका तासात झाला नव्हता. यांची फेकंम् फाक तर त्या आबुराव, बाबुरावपेक्षा ही भयंकर!” असे आशिष शेलार यांनी ट्वीट करत म्हटले आहे.

“हा दोष युवराजांचा नाही, मातोश्रीच्या बाहेरच्या डबक्यात कागदी होड्या सोडायच्या वयात हे मुंबईच्या पावसावर बोलणार तर असेच होणार ना? म्हणून युवराजांसाठी आमची प्रार्थना आहे. इन्हे कोई लौटा दो बचपन का सावन वो कागज की कश्ती, वो बारिश का पानी!” अशी टीका शेलार यांनी केली आहे.

हे ही वाचा:

एनडीआरएफने २० तासांच्या बचावकार्यानंतर ढिगाऱ्याखालून बाहेर काढले पण मृत्यूशी झुंज अपयशी

कुस्तीगीरांचे आंदोलन मागे, मात्र आता न्यायालयाची लढाई

‘बराक ओबामांमुळे सहा मुस्लिम राष्ट्रांवर बॉम्बहल्ला’

अधिक काम करण्यासाठी ‘केदारनाथ’ यात्रेतील ”खेचरांना देतात गांजा” !

आदित्य ठाकरे पत्रकार परिषदेत पावसाबद्दल बोलताना म्हणाले होते की, “आमच्या वेळी ४०० मिमी – ३०० मिमी प्रतितास पाऊस होत होता तेव्हा मी, महापैर किंवा उद्धव ठाकरे रस्त्यावर उतरुन लोकांचे प्रश्न सोडवत होतो.” यावरून आदित्य ठाकरेंना लक्ष्य करण्यात आले.

Exit mobile version