25.9 C
Mumbai
Monday, January 6, 2025
घरराजकारणठाकरे सरकारचे वागणे तालिबान सारखे

ठाकरे सरकारचे वागणे तालिबान सारखे

Google News Follow

Related

महाराष्ट्रात सध्या राणे कुटुंब विरुद्ध ठाकरे सरकार हा संघर्ष पुन्हा एकदा तापताना दिसत आहे. मंगळवार २९ डिसेंबर रोजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना कणकवली पोलिसांनी नोटीस बजावली आहे. नारायण राणे यांना बजावण्यात आलेल्या या नोटिसीवरून सध्या राज्याचे राजकारण पेटले आहे. भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी या प्रकरणात सरकारवर टीकास्त्र डागले आहे.

मंगळवार, २८ डिसेंबर रोजी पत्रकार परिषदेत बोलताना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना नितेश राणे कुठे आहेत असा प्रश्न विचारताच त्यांनी ‘नितेशचा पत्ता सांगालयला मला मूर्ख समजता का,’ असा प्रतिप्रश्न पत्रकारांना केला होता. या वक्तव्यावरून राणेंना नितेश राणे कुठे आहेत, याची माहिती असणार, असा संशय पोलिसांना आहे. त्यामुळे नितेश राणेंच्या प्रकरणात आता नारायण राणे यांना नोटीस देण्यात आली आहे. पण राणे न भेटल्यामुळे पोलिसांनी त्यांच्या घरावर ही नोटीस चिकटवली आहे.

यावरूनच आशिष शेलार आक्रमक झाले आहेत. ट्विटरवच्या माध्यमातून त्यांनी ठाकरे सरकारवर आसूड ओढला आहे. त्यांनी नारायण राणे यांना बजावण्यात आलेल्या नोटिसीचा फोटो ट्विटरवर टाकला आहे. “कोणत्याही प्रकारची चूक केली नसताना, केंद्रीय मंत्री मा. नारायण राणे यांना महाराष्ट्राचे पोलिस नोटीस बजावून आमच्या समोर येऊन उभे रहा असे आदेश देतात…वारे वा..ठाकरे सरकार! फुले, शाहू, आणि डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेऊन सरकार चालवतो म्हणायचे आणि तालिबान्यांसारखे वागायचे!” असे शेलार यांनी म्हटले आहे.

१८ डिसेंबरला संतोष परब यांच्यावर कणकवलीत हल्ला झाला होता. या प्रकरणाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकीय शत्रुत्वाची पार्श्वभूमी असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. त्यानुसार मुख्य संशयित आरोपी सचिन सातपुतेला सिंधुदुर्ग ग्रामीण पोलिसांनी दिल्लीतून अटक करण्यात यश मिळवले आहे. सातपुते हा भाजप आमदार नितेश राणे यांच्या स्वाभिमानी संघटनेचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे या प्रकरणात नितेश राणेंची चौकशी सुरू करण्यात आली. संतोष परब याच्यावरील हल्ल्याचे सूत्रधार नितेश राणे आणि गोट्या सावंत असल्याचा आरोप शिवसेनेने केला. संतोष परब हल्ला प्रकरणात सत्ताधारी आघाडी नितेश राणेंना गोवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी केला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा