जॉनी लिव्हर यांच्याबद्दल मला प्रेम आणि आदर आहे पण सिनेमातील जॉनी लिव्हर यांच्या एवढाच रोल संजय राऊत यांचा आहे अशी राऊतांवर अशिष शेलारांनी टीका केली आहे.
संजय राऊत हे सामना कार्यालयात संविधान लिहीत असतील यामुळे ते काहीही बरळत असतात. मीडियासमोर येऊन रोज पुड्या सोडणे आणि टीव्हीवर प्रेस घेणे हे संजय राऊत यांचे काम आहे. सिनेमातील जॉनी लिव्हर यांच्या एवढा रोल संजय राऊत यांचा आहे. जॉनी लिव्हर यांच्याबद्दल मला प्रेम आणि आदर आहे. पण सिनेमातील त्यांचा रोल एवढाच संजय राऊत यांचा रोल आहे. अशा शब्दात शेलार यांनी संजय राऊत यांचा समाचार घेतला.
हे ही वाचा:
बावनकुळेंविषयी केलेले ट्विट आव्हाड यांनी केले डीलिट; औरंगजेबाची कबर असल्याचा केला होता दावा
पोस्टरवरच्या अंगप्रदर्शनाला आक्षेप घेणारा महिला आयोग उर्फीबाबत गप्प?
अयोध्येत उभे राहणार ‘महाराष्ट्र भवन’
काँग्रेसला भगव्या रंगाचा इतका तिरस्कार का?
मुंबई मध्ये एकूणच नाल्यांची सफाई लवकर होत नसल्याचे दिसून येत आहे. याप्रकरणी आमदार आशिष शेलार यांनी मुंबई महापालिकेला पत्र लिहून निविद काढण्याची मागणी केली आहे. मुंबईतील मोठ्या नाल्यांच्या साफसफाईच्या कामाच्या निविदा अद्याप काढण्यात न आल्याने गेल्यावर्षीप्रमाणेच कामांना विलंब होणार का? असा सवाल उपस्थित करून या संदर्भात पालिका आयुक्तांना त्यांनी पत्र लिहून तातडीने या प्रकरणी लक्ष देण्याची मागणी शेलारांनी केली आहे. याच प्रकरणी शेलार यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
मुंबईत एकूण ३०९ च्या वर मोठे , तर ५०८ च्या वर छोटे नाले आहेत याचबरोबर ५ नद्या आहेत पण त्यांच्या साफसफाईच्या निविदा वेळेत निघाल्या नाहीत तर साफ सफाईच्या कामाला उशीर होतो आणि हाच उशीर मुंबईकरांच्या जीवावर बेततो. आपण दिरंगाईने नालेसफाईचे कंत्राट आणि निविदा काढता हा दरवर्षीचा अनुभव आहे. वेळेत कंत्राट आणि निविदा निघाल्या नाही तर सफाईच्या कामाला उशीर होतो , त्यामुळे एक स्पेशल टीम उपलब्ध करावी असे पत्र मी आयुक्तांना लिहिले असल्याची माहिती शेलारांनी दिली.
मुंबईतील प्रत्येक भागाचे सुशोभिकरण झाले पाहिजे . मागच्या २५ वर्षात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला या कामांसाठी वेळ मिळाला नाही. संपूर्ण मुंबईला पुतना मावशीचे प्रेम आहे का? आम्ही मुंबईकरांचे सेवक आहोत त्यामुळे काम करून घेणे ही आमची जबाबदारी आहे. नाल्या च्या प्रश्नांवर आम्ही करडी नजर ठेवून आहोत असेही ते म्हणाले.