आशीष शेलार यांनी उपस्थित केली शंका
भाजपा आमदार आशिष शेलार यांनी आज पोलीस उपायुक्त सौरभ त्रिपाठी या प्रकरणावरून विधानसभेत प्रश्न उपस्थित केले. केंद्रीय यंत्रणांच्या नावाने वसूलीचे षडयंत्र राज्यातील प्रशासकीय यंत्रणेत रचले जात नाहीये ना?, अशी शंका त्यांनी यावेळी उपस्थित केली. तसेच या प्रकरणी चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आशिष शेलार यांनी केली. शेलार यांची ही मागणी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मान्य केली आहे.
राज्याच्या पोलीस दलातील सौरभ त्रिपाठी हे आंगडीया या व्यापाऱ्याकडून आयकर अधिकारी असल्याचे भासवून वसूली करीत असल्याचे उघड झाले होते. त्यानंतर राज्य शासनाने सौरभ त्रिपाठी यांना निलंबित केले होते. यावर आशिष शेलार यांनी या कारवाईचे स्वागत केले.
हे ही वाचा:
हैदराबादमध्ये गोदामाला लागलेल्या आगीत ११ जण होरपळले
‘पाटणकर यांच्याशी झालेल्या व्यवहाराबद्दल मुख्यमंत्री बोलणार का?’
‘राष्ट्रीय महामार्गांवर ६० किलोमीटरच्या अंतरात एकच टोल असेल’
…आणि भारताने गाठले चार अब्ज डॉलर निर्यातीचे लक्ष्य
मात्र, हे प्रकरण समोर आल्यानंतर राज्यातील प्रशासकीय यंत्रणा अशा प्रकारे केंद्रीय यंत्रणांच्या नावाचा वापर करुन वसूली तर करीत नाही ना? यातूनच केंद्रीय यंत्रणांना बदनाम करण्याचे षडयंत्र तर राज्यातील प्रशसकीय यंत्रणेमध्ये शिजत तर नाही ना? सौरभ त्रिपाठी सारखे अन्य कोणी अधिकारी वसूली तर करीत नाही ना? त्यांच्या पाठीशी कोण उभे आहे की काय? असे प्रश्न आशिष शेलार यांनी उपस्थित केले. अशा प्रकरणांमुळे महाराष्ट्राची आणि देशाची बदनामी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही गंभीर बाब असून याप्रकरणी तातडीने शासनाने दखल देऊन आवश्यकता असल्यास चौकशी करावी, अशी मागणी आशिष शेलार यांनी केली. त्यावर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी याची शासन दखल घेत असून चौकशी केली जाईल, अशी घोषणा केली.
(2/2)@BJP4Maharashtra @BJP4Mumbai#Day13#BudgetSession2022#maharashtraassembly pic.twitter.com/9fJHqLpNvh
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) March 23, 2022